बेकायदा जन्म-मृत्यूचे दाखले आणि विविध परवाने देण्यासाठी नेमलेल्या ‘न्याती इन्फोसिस’ या कंत्राटदारावर महापालिकेची किती मेहेरनजर आहे, याचे आणखी काही प्रताप उघड झाले आहेत. या खाजगी कंत्राटदाराने महापालिका भवनामध्येच त्यांचे कार्यालय थाटले असून, त्यांच्याकडून महापालिकेची वीज आणि टेलिफोनची सेवा वापरली जात असल्याचे सांगण्यात आले.
↧