रिपब्लिकन पक्षाने महायुतीमध्ये मागणी केलेल्या जागांवरही भाजपने उमेदवार जाहीर करून टाकल्याने भीमसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 'आम्हाला महायुती तोडायची नाही, पण कदाचित ती तुटली, तर त्याला भाजपच जबाबदार असेल,' असा इशारा देत रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिका-यांनी मुंबईत रामदास आठवले यांच्याकडे मुंबईला धाव घेतली.
↧