कोर्टकचेरीच्या कचाट्यामुळे पक्षकार सामंजस्याने आणि समझोत्याने केसेस निकाली काढण्यास तयार होतात. मीडिएशनद्वारे केसेस निकाली काढण्याचा पर्याय उपलब्ध असून पुणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांकडून पक्षकारांच्या केसेस मीडिएशनसाठी पाठविण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात या वर्षी जुलै अखेरपर्यंत तीन हजार ७१८ केसेस मीडिएशनसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
↧