संपूर्ण पुणे महानगरावर ‘करडी नजर’ ठेवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आता तब्बल एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संशयास्पद व्यक्तींसह बेवारस वस्तूंचाही जागच्या जागी शोध घेण्याची यंत्रणा उभारण्याची योजना आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पोलिस, महापालिका आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रकल्पासाठी साठी तीस कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली.
↧