कर्नाटक विधानसभेने घेतलेल्या निर्णयाबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा किरण ठाकूर यांनी केला आहे. हक्कभंग समितीसमोर किरण ठाकूर यांनी आपल्याला वकिलामार्फत बाजू मांडण्याची मुभा असावी, कन्नड भाषा येत नसल्यामुळे दुभाषी घेण्याची परवानगी असावी, नेमका कोठे आणि कसा हक्कभंग झाला आहे, याचा निर्देश नेमकेपणाने करावा अशी विनंती केली होती. मात्र, हक्कभंग समितीने या मागण्या धुडकावून लावल्या.
↧