उद्घाटनापासूनच वादाच्या भोव-यात सापडलेले खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील गवळीवाडा येथील सार्वजनिक शौचालय पुन्हा वादात अडकले आहे. हे काम पूर्ण करण्यास नियोजित वेळेपेक्षा अकरा महिने उशीर झाल्यामुळे संबंधित ठेकेदाराला दहा टक्के (अंदाजे सहा लाख) दंड करण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
↧