संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला जुंपलेल्या मानाची बैलजोडी सर्जा-राजा, यांच्यातील सर्जा या बैलाचा बुधवारी दुपारी अचानक मृत्यू झाल्यामुळे काही काळ पालखी सोहळा थांबवावा लागला. अर्ध्या तासातच दगावलेल्या बैलाच्या जागी शुक-या या दुस-या बैलाला जुपण्यात आले, व सोहळा पुन्हा पुर्ववत सुरू झाला.
↧