पुण्याची ओळख एज्युकेशन हब म्हणून विकसित झाली असताना महाराष्ट्रातील भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांना अद्याप उच्च शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे राज्याच्या या मागास जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी पुण्यातील संस्थाचालकांनी पुढे यायला हवे, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष डॉ. वेद प्रकाश यांनी केले.
↧