शिर्डी येथील साईबाबा संस्थानाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलात विश्वस्त मंडळाने मेडिकल कौन्सिलची मान्यता नसलेल्या एका डॉक्टरची नेमणूक केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गेले चार महिने दररोज लाखो रुपयांची प्रॅक्टिस करणा-या या ‘डॉक्टर’चा पर्दाफाश करून शिर्डीकरांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.
↧