पतसंस्थेच्या परिसरातील काही दुकानेही चोरट्यांनी फोडली असून, एका परमिट रूममध्ये चोरी करून विदेशी मद्याच्या १३ बाटल्या चोरट्यांनी लांबवल्या आहेत. परिसरातील साई मेडिकल या औषध दुकानाचे कुलूप तोडून एक हजार रुपये रक्कम, गेनूजी भोर यांच्या बंद बंगल्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टांक आणि समया लांबविल्या आहेत. जुन्नरचे पोलिस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
गेल्या वर्षी व्यवस्थापकाचा खून
चोरी झालेल्या अनंत नागरी पतसंस्थेवर गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. त्या वेळी व्यवस्थापकाचा खून करून, अडीच लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला होता. वर्षभरानंतर पुन्हा चोरी झाल्याने येथील कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.
गुंजाळवाडीत सोने लांबविले
गुंजाळवाडी (बेल्हे) येथे दोन दिवसांपूर्वी १० दरोडेखोरांनी चाकू आणि सुऱ्याचा धाक दाखवून दोन ठिकाणांहून १३ तोळे सोने आणि एक लाखांचा ऐवज लांबवला. घराचा दरवाजा तोडून प्रवेश केलेल्या दरोडेखोरांनी भाऊसाहेब गुंजाळ यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून अंगावरील दागिने चोरले. दिनेश पिंगट यांच्या घरातही अशाचप्रकारे प्रवेश करून त्यांच्या आई आणि भावजयीकडील दागिने चोरून नेला होता. शस्राचा धाक दाखवून दागिने पळविण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चोरी करून जाताना चोरटे अन्य घरांच्या दारांना बाहेरून कडी लावत असल्याचे आढळून आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट