Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

व्होटर हेल्प सेंटरकडून मतदारांना हेल्प नाही

$
0
0
मतदारयादीतील नाव तपासण्यापासून चुकांची दुरुस्ती करण्यापर्यंतची कामे करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘व्होटर हेल्प सेंटर’मधून कोणतीही ‘हेल्प’ होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. हेल्प सेंटर नक्की कोठे आहेत, याचीही पुरेशी कल्पना नसल्याची तक्रार केली जात आहे.

सवलतीच्या दरातील धान्य घेण्यास नकार

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थींच्या यादीत स्थान मिळालेल्या ८० कुटुंबांनी आपले आर्थिक उत्पन्न अधिक असल्याने सवलतीच्या दरातील धान्य न घेण्याचा प्रामाणिकपणा दाखविला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस उत्पन्न दाखविण्याचे प्रकार सर्रास होत असताना या कुटुंबांनी सर्वांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

चिंचवड देवस्थानचा १७५ एकर सरकारी जमिनीवर दावा

$
0
0
चिखलीमधील एक हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या १७५ एकर सरकारी गायरान जमिनीवर चिंचवड देवस्थानने दावा केला असून ही जागा मिळण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या कोर्टात धाव घेतली आहे. या जमिनीच्या ‘हक्का’चा दावा पुणे सोडून कोकण महसूल विभागात चालविण्याची मागणीही देवस्थानने केली आहे.

अडीच हजार फ्लेक्स, बॅनरची ‘सफाई’

$
0
0
मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्देशांनंतर शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरवर पालिकेने केलेल्या धडक कारवाईत सोमवारी तब्बल अडीच हजार फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टर हटविण्यात आले. राजकीय पक्षांनी लावलेले बोर्ड आणि झेंडे या कारवाईतून सुटले नाहीत.

काँग्रेस वरिष्ठांचे ‘राष्ट्रवादी’वर तोंडसुख

$
0
0
पूर्वीचे मतभेद विसरून गेल्या काही दिवसांत दोन्ही काँग्रेसचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ सुरू झालेले असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस शौराज वाल्मकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जाहीर तोंडसुख घेतले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्याने काँग्रेसमधील इच्छुकांना मात्र घाम फुटला आहे.

...अन् सुटकेचा निःश्वास!

$
0
0
‘सिक्युरिटी एजन्सी’ पगार देत नसल्याच्या रागातून पगार मिळवण्यासाठी ‘सिक्युरिटी गार्ड’ने एका व्यावसायिकाच्या आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी घडला.

वाढणार बॅटरीचे आयुष्य!

$
0
0
बॅटरीचा वापर निम्म्यावर आणू शकणारा आणि बॅटरीचे आयुष्य वाढवू शकणारा ‘सुपर कॅपॅसिटर’ आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एआयटी)च्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. कार, जनरेटर सेट्सबरोबरच लष्करासाठीच्या इलेक्ट्रिकल गन आणि रॉकेट लॉँचर्ससाठीही हा सुपर कॅपॅसिटर वापरता येऊ शकणार आहे.

बारावीच्या उत्तरपत्रिकांना वाली तरी कोण ?

$
0
0
शिक्षकांनी बोर्डाच्या पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराच्या पाठोपाठ आता राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनीही बारावीच्या उत्तरपत्रिकांची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

बाजार समितीविरुद्ध आज व्यापाऱ्यांचा मोर्चा

$
0
0
बाजार समितीच्या प्रशासनाकडून होत असणाऱ्या मनमानी कारभाराच्या विरोधात दि पूना मर्चंट्स चेंबरचे प्रतिनिधी आज (मंगळवारी) सकाळी साडेदहा वाजता समितीच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

गडकऱ्यांची संहिता शंभर वर्षांनी रंगभूमीवर

$
0
0
विविध आशय आणि विषयांचे कलात्मक मिश्रण असणाऱ्या विनोद दोशी स्मृती नाट्य महोत्सवाचे उद्‍‍घाटन सोमवारी ‘संगीत गर्वनिर्वाण’ या पौराणिक नाटकाने झाले. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी लिखित या नाटकाचा मूळ संहितेवरील प्रयोग शंभर वर्षांनी रंगभूमीवर सादर झाला.

‘हातकागद’चा वर्ग कोराच

$
0
0
‘हँडमेड पेपर’पासून तयार केलेल्या लग्नपत्रिका, लेटरपॅड, पिशव्या, शोभिवंत वस्तूंची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असताना हँडमेड कागद निर्मिती करण्यास मात्र उदयोन्मुख उद्योजक पुढे येण्यास तयार नाहीत. हातकागद प्रशिक्षण घेण्यासाठी सरकारतर्फे विद्यावेतन, नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सबसिडी आणि स्वस्त दरातील कर्ज देण्यात येत असले तरी हातकागद संस्थेचा प्रशिक्षण वर्ग रिकामाचा राहतो आहे.

पावसाचा ‘दे धक्का’

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढते तापमान अनुभवणाऱ्या पुणेकरांना सोमवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरींनी आश्चर्याचा धक्का दिला. शहरातील अनेक भागांमध्ये हजेरी लावणाऱ्या या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता.

दादांचा आदेश डावलून औषधखरेदी?

$
0
0
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या औषध खरेदी घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताशेरे ओढूनही पुन्हा एकदा ही खरेदी प्रक्रिया मान्य करण्याचा घाट घातला जात आहे. आज (मंगळवार) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या औषधखरेदीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हवा रस्त्यांना प्राधान्यक्रम

$
0
0
नव्या पुण्याच्या नव्या पालिकेला रस्त्यांच्या विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सद्यस्थितीत शहरात असलेल्या काही भागांचा अपवाद वगळता उर्वरित गावांत अद्याप कच्चे रस्ते असल्याने त्यांच्या सुधारणेचा ‘मार्ग’ प्राधान्याने निवडावा लागणार आहे.

‘साधे’पणाचा दणका!

$
0
0
सर्वसामान्य ‘साध्या’ नागरिकाची पॉवर किती मोठी आहे, याचा अनुभव येरवडा पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना आला असून, तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.

‘डीपी’चा घोळ कायम

$
0
0
नागरिकांच्या हरकती-सूचनांवर सुनावणीसाठी समिती स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्याने पुण्याच्या विकास आराखड्याचा (डीपी) मार्ग मोकळा झाला असला, तरी संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी डीपीचा अहवाल सादर करण्यास आता दीड वर्षाचा अवधी देण्यात आला आहे. परिणामी, ‘डीपी’चा घोळ यापुढील काळातही कायम राहणार आहे.

बारावी उत्तरपत्रिकांचा फुटबॉल

$
0
0
शिक्षकांनी बोर्डाच्या पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराच्या पाठोपाठ आता राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनीही बारावीच्या उत्तरपत्रिकांची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

रंगला मोहक नृत्याविष्कार

$
0
0
मिया की तोडीतील तराणा सादर करत अपूर्वा आणि तिच्या सहकलाकारांनी उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवलं. तराण्यावरचा पदन्यास मोहक होता.

दोशी महोत्सवात दर्जेदार कलाकृती

$
0
0
विनोद दोशी स्मृती नाट्य महोत्सवाची सुरुवात सोमवारी संगीत गर्वनिर्वाण या पौराणिक नाटकानं झाली. नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या महोत्सवात यापुढेही दर्जेदार कलाकृती पाहायला मिळणार आहेत.

पुणे माझ्यासाठी लकी आहे : तुषार कपूर

$
0
0
गुडविन ज्वेलर्सच्या वतीने बंड गार्डन रोडवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोन्याच्या पेढीचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता तुषार कपूर, गुडविनचे ब्रँड ऍम्बेसिडर अभिनेत्री मनिषा लांबा यांच्या हस्ते रविवारी मोठ्या थाटात करण्यात आलं.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images