Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सुरक्षित मतदानासाठी उस्मानाबाद सज्ज

$
0
0
संवेदनशील उस्मानाबादमध्ये आज होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरक्षित वातावरणात पार पाडाव्यात यासाठी येथील जिल्हाप्रशासन सज्ज झाले आहे.

महायुतीत अखेर मांडवली

$
0
0
भाजपच्या वाट्याला आलेल्या प्रभागांमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रिंगणात असले, तरी या जागांवर भाजपच्याच उमेदवारांना पाठिंबा राहिल, असे शिवसेनेने सोमवारी स्पष्ट केले आहे.

नगरमध्ये 'वस्त्रहरण' जोरात!

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेसचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोन मातब्बर नेत्यांनी एकमेकावर आरोप-प्रत्यारेाप, वैयक्तिक निंदा, टिंगलटवाळी करूनच जिल्हा परिषद निवडणुकीचा फड गाजवला.

राष्ट्रवादीच असेल नंबर वन!

$
0
0
संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीगोंदा, येथे काँग्रेसचा प्रभाव आहे. तर नेवासा, शेवगाव, पाथडीर्, कर्जत, जामखेड, अकोले, पारनेर, श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी जोरात आहे. राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात या दोन मंत्र्यानी काँग्रेसचा किल्ला जोरदार लढविला असला तरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात काँग्रेस दुबळे आहे.

सहावं वरीस शाळेचं!

$
0
0
एज्युकेशन हब, आयटी-बीटीचे शहर म्हणून दिवसागणिक विस्तारणाऱ्या पुण्यात शालाबाह्य मुलांचे प्रमाण 'लक्षणीय' आहे. शिक्षण हक्क कायदा, सर्व शिक्षण अभियान यासारख्या योजना कागदावर परफेक्ट दिसत असल्या तरी मुलांना शाळेपर्यंत आणण्यात त्या कमी पडत आहेत.

सत्ता द्या, अन्यथा विकासात अडथळे

$
0
0
केंदात व राज्यात काँग्रेस सत्तेवर या दोन्ही सरकारच्या माध्यमातून येणारा निधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून खर्च होत असतो. या संस्था अन्य पक्षाच्या ताब्यात गेल्यास विकासात अडथळे निर्माण होतात.

तीन आमदार असूनही सेना-भाजप केविलवाणी

$
0
0
सांगली जिल्ह्यात तीन आमदार असूनही भाजप-शिवसेनेची स्थिती केविलवाणी झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी केवळ ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले गेले आहेत.

तोफा थंडावल्या, धाबे हाऊसफुल्ल

$
0
0
प्रचाराच्या काळात आणि तोफा थंडावल्यानंतरही जिल्ह्यातील बहुतेक सर्व धाबे, बार, हॉटेल्स रात्रीच्यावेळी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मटन व मद्याची मागणी प्रचंड प्रमाणात मागणी वाढली असून नेत्यांच्या अस्तित्वाचीच लढाई असल्याने प्रचारात 'सर्व प्रकार' हाताळले जात आहेत.

पवारांचे राजकारण स्वार्थाचे

$
0
0
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार आटोपता घेताना, प्रतिस्पधीर् पक्षांच्या वमीर् प्रहार करण्याची संधी सगळ्याच राजकीय नेत्यांनी पुरेपुर वापरली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त

$
0
0
काँग्रेस नेते व मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या राजकीय 'वस्त्रहरण' प्रयोगामुळे विशेष गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून, त्यासाठी कर्नाटक, गोवा या राज्यांतून जादा पोलिस तुकड्या मागवण्यात आल्या आहेत.

आऊटसोर्सिंग बंदीचे स्वागतच

$
0
0
परीक्षा विभागातील कामकाजाचे 'आऊटसोर्सिंग' हा तात्पुरता उपाय असून 'आऊटसोर्सिंग' बंद करत परीक्षा विभाग सक्षम करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी भूमिका पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या सदस्यांनी नोंदवली.

लवकर रिझर्वेशनचा फायदा रेल्वेलाच

$
0
0
प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून चार महिने अगोदर रेल्वे तिकिटाचे बुकिंग करण्याची सुविधा रेल्वे उपलब्ध करणार असली तरी प्रवाशांना त्याचा फायदा होणार नाही. उलट, चार महिने अगोदर होणाऱ्या तिकीट बुकिंगमुळे रेल्वेची तिजोरी अॅडव्हान्समध्ये भरणार आहे.

अटी घालत गुंड मारणेची सुटका

$
0
0
महापालिका निवडणूक संपेपर्यंत कोथरूड पोलिस स्टेशन येथे दिवसातून तीन वेळा हजेरी लावण्याच्या अटीवर कुख्यात गुंड गजानन मारणे याची सुटका करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बोस यांनी हा आदेश दिला.

कीटकनाशकांना पर्याय निंबोणीचा

$
0
0
अत्यंत जहाल कीटकनाशके वापरण्यापेक्षा वनौषधीतील कल्पवृक्ष मानल्या जाणाऱ्या निंबोणीच्या बियांमुळे डासांसह इतर कीटकांचा उपदव टाळता येऊ शकतो, यामुळे निसर्ग आणि मानवाचे कोणतेही नुकसान होत नाही!... ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भालचंद पाठक यांनी निंबोणीच्या बियांचा एक विशेष फॉर्म्युला तयार केला असून, सेंट्रल इंसेक्टिसाइड बोर्डाकडून त्यांच्या फॉर्म्युल्याला मान्यता मिळाली आहे.

पोलिसांचे 'प्रीव्हेंशन इज बेटर दॅन क्यूअर'

$
0
0
महापालिका निवडणुकांमध्ये गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी दंडुका उगारला आहे. नाना पेठ परिसरात बुधवारी दुपारी अचानक 'कोंबिग ऑपरेशन' करून स्थानिक दोन टोळ्यांच्या ४० गुन्हेगारांना सक्त ताकीद दिली आहे.

संवादाने साधला गेला पुन्हा मैत्रीचा पूल...

$
0
0
पंधरा वर्षांची घट्ट मैत्री असलेल्या त्या दोघांच्या मैत्रीत पैशांचा व्यवहार आडवा आला आणि मैत्रीला ग्रहण झाले. पैशांच्या कारणावरून एकमेकांविरूद्ध कोर्टात गेली सात वषेर् ते कोर्टात भांडत होते. त्या दोघांमध्ये मध्यस्थी करून संवाद घडवून आणण्यात आल्यामुळे त्यांची मैत्री पुन्हा घट्ट झाली. दोघांनीही कोर्टातील केस सामंजस्याने मिटविली.

बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध मोहीम

$
0
0
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींविरूद्ध मोहीम उघडली आहे. गुन्हे शाखेने रेकॉर्डवरच्या दोघा गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि ९ काडतुसे जप्त केली आहेत.

'रुबी'तील माजी डॉक्टर फरार

$
0
0
गर्भलिंग निदान प्रतिबंधात्मक कायद्यानुसार अनियमित एफ फॉर्म, पेशंट्सची संमतीपत्रावर स्वाक्षरी नसण्याच्या त्रुटी आढळल्याने रुबी हॉस्पिटलच्या दोघा डॉक्टरांपैकी एका डॉक्टरला कोर्टाने फरार घोषित केले आहे.

विद्यार्थ्यांना मिळाल्या 'टू द पॉइंट' टिप्स

$
0
0
मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम निवडताना स्वत:ची आवड, संस्थेची विश्वासार्हता या गोष्टी कशा तपासून बघायच्या, प्रवेशाच्या वेळी मुलाखत; तसेच ग्रुप डिस्कशनला कसे सामोरे जायचे, याच्या अगदी 'टू द पॉइंट' टिप्स विद्यार्थ्यांना मंगळवारी मिळाल्या.

जिल्ह्यात आता ताण निकालाचा!

$
0
0
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांवर आता निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांच्या अथक प्रचारानंतर बहुतांश उमेदवारांनी बुधवारी विश्रांती घेतली. दरम्यान, मतदानानंतर मतदान यंत्रे सुरक्षितस्थळी पोहोचली असून, कडक पोलिस बंदोबस्तात त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images