पदपथांसह इतरत्र झालेल्या अतिक्रमणांमुळे शहराच्या मध्यवस्तीत श्वास कोंडलेल्या शिवाजी रस्त्याला शनिवारी अखेर मोकळा श्वास घेता आला. विश्रामबागवाडा सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे अतिक्रमणे हटविण्यासाठी शनिवारी धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तब्बल सहा ट्रक माल जप्त करण्यात आला.
↧