लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील निवासी क्षेत्रात राजरोसपणे अवैधरित्या सुरू असलेली भंगाराची दुकाने तत्काल बंद करणे, इंदायणी नदीपात्रात व लगतची अवैध बांधकामे व मातीचा भराव करणा-यांच्या परवान्यांना स्थगिती देणे, लोणावळा नगरपालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणा-या टँकरची फी दुप्पट करणे आदी विषयांस लोणावळा नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली.
↧