'सरकारी ऑफिसमधील रोजच्या कामांचा ताण आणि कर्मचा-यांच्या संख्येत तफावत आहे. ती दूर झाल्यास कामात गतिमानता येईल,' असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित अभ्यंकर यांनी शनिवारी मांडले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पुणे शाखेच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
↧