तारगाव येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने सात गावक-यांवर हल्ला केला तसेच दहा पेक्षा अधिक जनावरांना जखमी केल्याने गावात खळबळ उडाली. अखेर कोल्ह्यापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांसह तरुणांनी त्याला जेरबंद केलं. परंतु पशु वैद्यकीय डॉक्टर येण्यापूर्वीच त्या कोल्ह्याचा जीव गेला.
↧