लोणावळ्यातील भूशीडॅममध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला. रणजितसिंग र्इश्वरसिंग पहारी ( ५०, रा. दिल्ली, सध्या कोरेगाव, पुणे ) असे मयताचे नाव आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. भुशीडॅमवरील सुरक्षारक्षक रामदास मरगळे यांना धरणातील पाण्यात मृतदेह तरंगताना आढळल्याने त्याने याबाबत लोणावळा शहर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी स्थानिकाच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
↧