केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘यूआयडी’ (आधार) कार्ड योजनेमध्ये पुढील काळात गॅस ग्राहक आणि शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी ही माहिती दिली. शहरी आणि ग्रामीण भागातील अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळावे यासाठी दोनशे नवीन मशीन घेतली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
↧