पुणे महापालिकेच्या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) नगरविकास विभागामार्फत करण्यात आलेल्या फेरबदलांनंतर आरक्षण ठेवलेल्या जमिनींची स्थळपाहणी करण्याचे काम गुरुवारी पूर्ण करण्यात आले. या पाहणीनंतरच्या सद्यस्थितीचा अहवाल लवकरच राज्य शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे नगररचना उपसंचालक अविनाश पाटील यांनी सांगितले.
↧