एसटीतर्फे चालवण्यात येणा-या आंतरराज्य बससेवेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी ( ३० ऑक्टोबर) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एसटीतर्फे चालवण्यात येणा-या आंतरराज्य बससेवेचा आढावा घेणार असून कोणत्या बससेवा बंद आहेत, कोणत्या ठिकाणी नवीन सेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे, याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले.
↧