सासवड शहर विकास आराखड्याच्या प्रारूपावरील वादग्रस्त आरक्षणे, अल्प भूधारक जमीन मालकांवर त्यामुळे भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. यामुळे ६ महिने उशिराने प्रसिद्ध केलेला हा शहर विकास आराखडा वादग्रस्त ठरला असून त्यावर १८०० मिळकतदरांनी आक्षेप व हरकती नोंदविल्याची माहिती प्रशासनाने दिली. पहिल्या दिवशी ११२ जणांना उपस्थित राहून आपले म्हणणे लेखी देण्याचे पत्र देण्यात आले आहे.
↧