घरफोडी करून पळून निघालेल्या चोरट्यांना रोखणा-या पोलिसांवरच वार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना न-हे रोडवर घडली. या हल्ल्यात हवेली पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जखमी झाले. ऋतुगंध सोसायटीत शुक्रवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास हा थरार घडला. पोलिसांनी पाठलाग करून गोळीबार केला. मात्र, चोरट्यांनी पळ काढला.
↧