पुणे-लोणावळ्यादरम्यान धावणा-या दोन लोकल दस-यानिमित्त सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे. पिंपरी ते दापोडी स्टेशनदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे दुपारी तीन वाजता पुण्याहून लोणावळ्याला जाणारी लोकल आणि दुपारी दोन वाजता लोणावळ्याहून पुण्याला येणारी लोकल चिंचवड स्थानकापर्यंतच धावणार होती.
↧