स्केटिंग पाहताना आपल्या अंगावर काटा आला नाही तर आश्चर्यच ! आपल्या शरीराचा तोल ढळू न देता पायाला बांधलेल्या चाकांव्दारे (स्केटस) सादर केल्या जाणा-या या मनोहरी खेळाला दांडियाची साथ मिळाली तर ? हो हे खरे आहे. चिंचवड येथील सिद्धी प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवामध्ये ‘स्केटिंग दांडिया’ हा नवीन प्रकार पहायला मिळत आहे. स्केटिंग आणि दांडिया यांची सांगड घालून धरला जाणारा फेर पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
↧