नागपूर दोन हजार ते अडीच हजार रुपये...अमरावती सुमारे दोन हजार रुपये...यवतमाळ दीड हजार ...जबलपूर पावणेतीन हजार...बेंगळुरू दोन हजार रुपये ! हे प्रवास दर, कुठल्या विमान प्रवासाचे नव्हेत; तर खासगी ट्रॅव्हल्सचे आहेत. दिवाळीत पुण्याहून घरी जाण्यासाठी आता एवढे पैसे मोजावेच लागतील. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सामान्यांचे ऐन दिवाळीत ‘दिवाळे’ निघण्याची शक्यता आहे.
↧