पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची शनिवारी (१३ ऑक्टोबर) होऊ घातलेली बैठक शिक्षकांच्या प्रश्नांवर गाजणार, अशी चिन्हे आहेत. शिक्षक संघटनांनी शुक्रवारीच त्याची झलक दाखवून कुलगुरू कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण केले. हे आंदोलन शनिवारीही सुरू राहणार असून, या मागण्यांबाबत अधिसभेतही स्थगन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
↧