पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, ‘सीआयडी’चे प्रमुख अप्पर पोलिस महासंचालक एस. पी. यादव यांच्यासह पुणे शहरातील ११ पोलिस अधिकारी- कर्मचा-यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली. एकूण पदकविजेत्यांमध्ये राज्यातील ४३ पोलिस अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे. पोळ आणि यादव यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतीपदक देण्यात येणार आहे.
↧