'प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारची बुद्धिमत्ता असतेच. परंतु करिअरच्या ठोकळेबाज कल्पनांमध्ये अडकल्याने आपल्याला फक्त पुस्तकी बुद्धिमत्ता हीच बुद्धिमत्ता वाटते. स्वत:चा कल, सूर ओळखत त्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत होणे म्हणजेच उत्तम करिअर होय,' असे मत माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडलाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी सोमवारी व्यक्त केले.
↧