अरुणाचल प्रदेशातील पाक्के व्याघ्रप्रकल्पाची विशेष ओळख असलेले हॉर्नबिल आणि निशी या जमातीचे अनोखे नाते अनुभविण्याची संधी पुणेकरांना जिविधा संस्थेने उपलब्ध केली आहे. या हॉर्नबिलचे गेल्या तीन वर्षांपासून संशोधन करणारी अमृता राणे हिचे लॉ कॉलेज रोड येथील रामचंद राठी हायस्कूल येथे बुधवार (१३ जून) सायं ६.३० वाजता व्याख्यान आयोजिण्यात आले आहे.
↧