Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कँटोन्मेंट बोर्डात निवडणूक लवकरच

$
0
0
देशातील ५८ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, अकरा जानेवारीला घेण्यात येणाऱ्या या निवडणुकांसाठीची आचारसंहिता शुक्रवारपासून (७ नोव्हेंबर) लागू करण्यात आली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करावा, अशी सूचना डायरेक्टर जनरल रविकांत चोपडा यांनी दिल्या.

हवा बारामतीसारखा विकास

$
0
0
दौंड तालुका पुणे शहराच्या उंबरठ्याजवळ आला आहे. पुण्याची पूर्व भागातील तिसरी महानगरपालिका अस्तित्त्वात आल्यानंतर तिच्या हद्दी दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील गावांलगत असतील.

कागदपत्रे पडताळणीसाठी आता पोलिसांचाच पुढाकार

$
0
0
पासपोर्टच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नागरिकांना कित्येक महिने मारावे लागणारे हेलपाटे कमी करण्यासाठी आता पोलिसांनीच पुढाकार घेतला आहे. वानवडी पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी पासपोर्ट कागदपत्र मेळावा भरविण्यात आला होता.

कात्रज-देहूरोड प्रवास झाला जीवघेणा

$
0
0
पायाभूत सुविधांचा अभाव, रस्ता रुंदीकरणाचा रेंगाळलेला प्रकल्प आणि बेशिस्त वाहतूक अशा परिस्थितीत कात्रज-देहूरोड बायपास रस्ता जीवघेणा ठरतो आहे.

मनसेच्या उमेदवाराने आणला ११ लाखांचा घोडा!

$
0
0
वडगाव शेरी मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे नारायण गलांडे यांच्या कुटुंबीयांनी अकलूज (ता. इंदापूर) गावच्या घोडे बाजारातून तब्बल अकरा लाखांचा घोडा विकत घेतल्याने परिसरात याची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, मुक्या प्राण्यांवर असलेल्या प्रेमापोटी आणि हौस म्हणून घोडा विकत घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

महापालिकेतही एकहाती सत्ता मिळवू

$
0
0
लोकसभा आणि विधानसभेनंतर आता पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता मिळविण्याचा निर्धार भाजपच्या पुण्यातील आमदारांनी व्यक्त केला.

भुशी डॅममध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

$
0
0
लोणावळा येथील खंडाळा येथे शिबिरासाठी आलेल्या दोन कॉलेज युवकांचा भुशी डॅममध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

सहकार निवडणुकीसाठी आचारसंहिता

$
0
0
राज्यातील सुमारे चाळीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या डिसेंबरअखेर घेण्यात येणार असून या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांनी जाहीर केली आहे.

शिवाजी मार्केटमधील परवाने रद्द करू

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसरात डेंगीचे डास वाढण्यास कारणीभूत ठरत असलेल्या शिवाजी मार्केटची बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सी. व्ही. अजय यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.

पुणे- कोल्हापूर मार्गावर इलेक्ट्रॉनिक वजन काटे

$
0
0
क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करणाऱ्या जड वाहनांवर आता तत्काळ कारवाई करणे शक्य होणार असून त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसविण्यात येणार आहेत. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी व तासवडे या दोन टोलनाक्यांवर प्रायोगिक तत्वावर हे वजन काटे बसविण्यात येणार आहेत.

स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी देण्याचे आदेश

$
0
0
राज्यातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना प्यायला स्वच्छ पाणी, महिलांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था आणि स्वच्छतागृहे, रास्त दरात अन्न पदार्थ यासारख्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश पणन व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाजार समित्यांना दिले आहेत.

LBT रद्द करण्याचे लेखी आश्वासन पाळा

$
0
0
व्यापारावर तत्कालीन आघाडी सरकाराने लावलेल्या एलबीटी करातून व्यापाऱ्यांची सुटका करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने आता तातडीने एलबीटी रद्द करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नवा कोणताही कर लावू नये, असेही साकडे त्यांनी घातले आहे.

विरोधापुढे ‘माननीयां’चा नाइलाज!

$
0
0
घनकचरा विभागासाठीच्या निधीचे वर्गीकरण करून महापौर-उपमहापौरांसाठी अलिशान गाड्या घेण्याच्या प्रस्तावावर सर्व स्तरांतून टीका होत असल्याने अखेर ‘माननीयां’नी नव्या गाड्या स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेत माघार घेतली आहे.

बालभारती-पौड फाटा रस्ता मार्गी लागणार?

$
0
0
कर्वे रोड आणि लॉ कॉलेज रोडवरील वाहतुकीला पर्याय ठरणारा पौड फाटा ते बालभारती हा रस्ता अखेर मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तज्ज्ञांकडून तपासणार बांधकामांचा दर्जा

$
0
0
महापालिका हद्दीलगतच्या गावांतील बेकायदा बांधकामे आणि त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी आज, शनिवारी बैठक बोलाविली आहे.

चोरट्यांची पुन्हा वाढली हिंमत

$
0
0
प्रभात रोडवरील पारिजातक बंगल्याबाहेर गुरुवारी सायंकाळी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत सोनसाखळी चोरांनी शहरात पुन्हा डोके वर काढल्याच्या वेगवेगळ्या घटनांवरून समोर येत आहे.

महसूल, ग्रामविकास विभाग सरसावले

$
0
0
राज्यात डेंगीच्या डासांनी थैमान घातले असल्याने हादरलेल्या आरोग्य यंत्रणेने आता पुन्हा प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्धार केला आहे.

महापौर, उपमहापौरांची गाड्या खरेदीवरून माघार

$
0
0
घनकचरा विभागासाठीच्या निधीचे वर्गीकरण करून महापौर-उपमहापौरांसाठी अलिशान गाड्या घेण्याच्या प्रस्तावावर सर्व स्तरांतून टीका होत असल्याने अखेर ‘माननीयां’नी नव्या गाड्या स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेत माघार घेतली आहे.

१० वीचे अर्ज १० नोव्हेंबरपासून

$
0
0
दहावीच्या परीक्षेसाठी १० नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरावेत, अशा सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. माध्यमिक शाळांनी नियमित शुल्कासह १० ते २० नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन अर्ज भरावेत, असे मंडळाने कळवले आहे.

गळा दाबून पत्नीचा खून

$
0
0
लहान मुलावरून झालेल्या भांडणातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना संभाजीनगर येथे गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images