Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चलनवाढीच्या दरावर नियंत्रण घातक

$
0
0
चलनवाढीच्या दरावर सरकारने नियंत्रण ठेवणे ही बाब राष्ट्राच्या दीर्घकालीन आर्थिक प्रगतीसाठी घातक असल्याचे मत नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ प्रोफेसर फिन किडलँड यांनी गुरुवारी पुण्यात व्यक्त केले.

विद्यार्थी, गृहिणींना ‘अन्नसुरक्षे’चे धडे

$
0
0
राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी आहार मिळण्याचा हक्क प्रदान करण्यासाठी आता एक कोटी शालेय विद्यार्थी आणि गृहिणींना ‘अन्न सुरक्षे’चे धडे देण्यात येणार आहेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्यासाठी मोहीम हाती घेतली असून येत्या दोन महिन्यात राज्यभरात व्यापक चळवळ उभारण्यात येईल.

गंभीर पेशंटना ‘ससून’चाच आधार

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये डेंगीचे पेशंट उपचारासाठी येण्याची संख्या वाढत चालली असल्याने आरोग्य विभागाकडून औषध फवारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

‘बीएसएनएल’ कर्मचारी वसाहतीला नोटीस

$
0
0
संपूर्ण शहराला डेंगीच्या डासांनी विळखा घातला असताना सरकारी कार्यालये आणि कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती देखील अपवाद राहिल्या नाहीत.

कॉँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपचा दणका

$
0
0
राज्यात प्रशासक असलेल्या ७० ते १०० कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तत्कालीन आघाडी सरकारने स्थापन केलेली प्रशासक मंडळे बरखास्त करण्याची कारवाई नव्या भाजप सरकारने सुरु केली आहे.

अनधिकृत बांधकामांच्या व्यवहारांना चाप शक्य

$
0
0
अनधिकृत बांधकामांची खरेदीविक्री करण्याच्या व्यवहारांना कायद्याने चाप लावण्याबाबत नोंदणी विभाग आणि महसूल विभाग यांच्यात मतभेद आहेत.

तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाकडे लक्ष

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) आर्थिक ओढाताण होत असल्याने तिकीट दरांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आज, शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. तसेच, गेल्या वर्षभरापासून रखडलेला नव्या बसखरेदीचा प्रस्तावही मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कृपादृष्टी?

$
0
0
रस्त्याच्या कामांसाठी जादा दराने बिले देणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देत ठेकेदारांवर तत्काळ कारवाई करणाऱ्या पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इनामदार हॉस्पिटलच्या बेकायदा बांधकाम प्रकरणात मात्र दोषी अधिकाऱ्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न चालविला आहे.

विरोधकांचे सत्ताधाऱ्यांसोबत लागेबांधे

$
0
0
एका बाजूला पीएमपीला पैसे देण्यासाठी टाळाटाळ करणारी पालिका पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर वारेमाप खर्च करत असल्याबद्दल स्वयंसेवी संस्थांनी पालिकेवर टीकास्त्र सोडले आहे.

पालिकेचे बायोगॅस प्रकल्प वाऱ्यावर

$
0
0
शहरातील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी महापौरांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना मोशी येथील जागा देण्याचे गाऱ्हाणे घातले असले, तरी पालिकेच्याच बायोगॅस प्रकल्पांकडे मात्र त्यांचे अद्याप लक्ष नाही, असेच चित्र आहे.

तपास खोल्यांमध्ये थेट सीसीटीव्हीच

$
0
0
पोलिस ठाण्यांमध्ये होणारे कोठडीतील मृत्यू (कस्टोडियल डेथ) रोखण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसवण्याचा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. येत्या बारा आठवड्यांमध्ये राज्य सरकारला याबाबतचा अहवाल हायकोर्टाला सादर करावा लागणार आहे.

भारती विद्यापीठ ‘तुपाशी’...

$
0
0
भारती विद्यापीठाला संपादित करून दिलेल्या कात्रज येथील सतरा एकर जमिनीचा हक्काचा मोबदला मिळण्यासाठी मूळजमीन मालकांना वणवण करावी लागत आहे. हायकोर्टाने भूसंपादनाची चौकशी करून मूळमालकांना न्याय देण्याचा आदेश देऊनही गेली कित्येक वर्षे महसूल न्यायालयात त्यांची बोळवण होत आहे.

मुंबई न्यायालय म्हणा

$
0
0
बॉम्बे हायकोर्टाचे नामकरण मुंबई व गोवा उच्च न्यायालय असे करण्यात यावे, अशी शिफारस मराठी भाषेच्या नव्या धोरणात सरकारला करण्यात आली आहे. कोर्टात मराठीमध्ये निकाल देण्याचे प्रमाण सध्या फक्त ४० टक्के असून येत्या तीन वर्षांत शंभर टक्के निकाल मराठीतून देण्यात यावेत, असेही या समितीने सरकारला सुचविले आहे.

आर. के. लक्ष्मण यांचा वाढदिवस

$
0
0
प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा ९४वा वाढदिवस गुरुवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या गाजलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

सरदार पटेल प्रातःस्मरणीय नाहीत

$
0
0
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. अर्थात, भारतीय जनता पक्षाने पटेल यांचा बोलबाला सुरू केला असला, तरी भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी सरदार अद्याप ‘प्रातःस्मरणीय’ नाहीतच.

‘इस्रो’ मानवी अवकाश मोहिमेवर

$
0
0
मंगलयानाच्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) मानवी अवकाश मोहिमेची तयारी सुरू केली असून, त्याचा पहिल्या टप्प्याला डिसेंबरच्या पूर्वार्धात प्रारंभ होईल. या मोहिमेअंतर्गत इस्रोचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे रॉकेट ‘जीएसएलव्ही मार्क ३’ आणि मानवरहित अवकाशकुपीचे (स्पेस कॅप्सूल) पहिले प्रायोगिक प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून होणार आहे.

‘यूएलसी’ची फाइल ‘ओपन’

$
0
0
पुण्यातील ‘यूएलसी’ जमीन गैरव्यवहारात मूळ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून बड्या धेंडांना संरक्षण देणाऱ्या आघाडी सरकारच्या ​कारभाराला भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त सरकारने आता लगाम लावण्यास प्रारंभ केला आहे.

सायकल चालवा, आरोग्य, निसर्गाचा धोका रोखा

$
0
0
‘सायकल चालवा, आरोग्य आणि निसर्गाचा धोका रोखा’ असा संदेश देत ‘टीम क्रँक’च्या पाच सदस्यांनी चिंचवड ते गोवा असा सुमारे पाचशे किलोमीटरचा सायकल प्रवास नुकताच पूर्ण केला.

नगरसेवक निवडून आणून दाखवा

$
0
0
‘आमदार झालात तर आता नगरसेवक पदाचा राजीनामा द्या आणि तुमच्या जागी नगरसेवक निवडून आणूनच दाखवा,’ असे जाहीर आव्हान माजी आमदार विलास लांडे यांनी आमदार महेश लांडगे यांना दिले आहे.

काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता

$
0
0
देशातील कँटोन्मेटच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने कँटोन्मेंटमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. खडकी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे असून, अनेक माजी उपाध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images