Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

RCC कन्सल्टंट कुलकर्णींना अटक

$
0
0
नऱ्हे येथील पिताराम कॉम्प्लेक्स कोसळल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी ‘आर. सी. सी कन्सल्टंट’ला अटक केली. कोर्टाने या इंजिनीअरला सहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे.

मारणे, घायवळ टोळीत पुन्हा भडका

$
0
0
गँगस्टर गजानन मारणे आणि नीलेश घायवळ या टोळ्यांमध्ये पुन्हा भडका उडाला आहे. घायवळ टोळीचा प्रमुख साथीदार असलेला संतोष उर्फ पप्पू हिरामण गावडे याचा सोमवारी मध्यरात्री लवळे येथील गावडे वस्तीजवळ कोयता, सुऱ्याने वार करत खून करण्यात आला आहे.

३८ गावांत ‘मृत्यूंचे सापळे’

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत समावेश होऊन पालिकेची बांधकाम नियंत्रण नियमावली (डीसीरूल्स) लागू होण्याच्या भीतीने ३८ गावांत अनधिकृत बांधकामांचे हजारो सांगाडे उभे राहिले आहेत. अत्यंत घाईघाईने सुरक्षिततेचे सर्व निकष धुडकावून उभी राहत असलेली ही बांधकामेच मृत्यूचे सापळे ठरत आहेत.

डॉ. सायरस पूनावाला यांना 'पुण्यभूषण'

$
0
0
‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून लसनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

११ लाख रुपयांची रास्ता पेठेत घरफोडी

$
0
0
रास्ता पेठेतील अजंठा कॉम्प्लेक्समधील फ्लॅट फोडून सुमारे ११ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. रोहित मेहता (वय २८, रा. रास्ता पेठ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांवर दगडफेक; दोन जणांना अटक

$
0
0
संशयास्पद वाटणाऱ्या इनोव्हा कारमधील व्यक्तींना पाहण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडला. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

विजेच्या धक्क्याने मृत्यू

$
0
0
खडकी परिसरात पाण्यात वीजप्रवाह उतरून झालेल्या दोघांच्या मृत्यूप्रकरणी महावितरणच्या खडकी कार्यालयातील तिघांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.

राज्यातील रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवण्याची मागणी

$
0
0
बांधकाम क्षेत्रातील मंदीचे सावट लक्षात घेऊन राज्यातील रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवावेत, अशी मागणी ‘क्रेडाय महाराष्ट्र’ने राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे. रेडी रेकनरच्या अवास्तव दरामुळे पुणे शहर व परिसरात अनेक व्यवहार रखडल्याचे संघटनेने म्हटले आहे.

खुनातील आरोपीला अटक

$
0
0
तळेगाव दाभाडे येथील ‘आरपीआय’च्या कार्याध्यक्षाच्या खुनात गेल्या दोन वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली. या आरोपीविरुद्ध खुनाचे दोन, चोरी-हाणामारीचे चार गुन्हे दाखल आहेत.

क्षेत्रीय कार्यालये झाली गोडाऊन

$
0
0
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या हडपसरमधील गोडाऊनला मंगळवारी आग लागून मोठे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील परिस्थितीचा आँखो देखा हाल…

वा‌हतूक कोंडी आणि सुविधांचा अभाव

$
0
0
सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली नगर रोडवरील उपनगरे अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पाणी, कचराप्रश्न, उद्याने, क्रीडांगणे अशा मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पिरंगुटमध्ये कोट्यवधींची फसवणूक

$
0
0
गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन संबंधित एजंट पसार झाल्याचा प्रकार पुण्यातील पिरंगुट येथे घडला. जमिनीच्या विक्रीतून मिळालेले पैसे गुंतवणुकीसाठी वापरल्याने जमिनही गेली आणि पैसेही गेले, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे.

पवारांच्या क्लबला ‘महावितरण’चा शॉक

$
0
0
लाखोंचे वीजबिल थकवल्याने येथील प्रसिद्ध ‘बारामती क्लब’ला महावितरणने कारवाईचा शॉक दिला आहे. दिलेल्या मुदतीत बिल न भरल्याने क्लबचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.

‘स्ट्रक्चरल इंजिनीअर्स’ची यादी पालिकेच्या वेबसाइटवर

$
0
0
शहराच्या हद्दीलगतच्या इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी आता जोर धरत असतानाच, दुसरीकडे महापालिकेनेही शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

गृहप्रकल्पाची संपूर्ण माहिती द्या

$
0
0
अनधिकृत बांधकामांपासून नागरिकांनी चार हात दूर राहावे, ते विकत घेत असलेला फ्लॅट अधिकृत आहे की अनधिकृत, त्या कामाचा दर्जा याची त्यांना माहिती मिळावी या गोष्टीसाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये त्या प्रकल्पाच्या परवानगीची विविध कागदपत्रे दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रुपी बँकेचे पुनरूज्जीवन होणार?

$
0
0
आर्थिक अडचणीत आलेल्या रुपी बँकेच्या पुनरूज्जीवनासाठी केंद्र व राज्य सरकारकडे नवा पर्याय समोर आला आहे. नांदेड, नागपूर, बुलढाणा आणि वर्धा या जिल्हा बँकांप्रमाणेच सरकारी भागभांडवलाचे टॉनिक मिळाले, तर रुपी बँकेचेही पुनरूज्जीवन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डॉ. सायरस पूनावाला यांना पुण्यभूषण पुरस्कार

$
0
0
‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून लसनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्राध्यापकांना ‘धडा’ शिकविणार?

$
0
0
प्राध्यापक होण्यासाठी पात्र उमेदवारांची वाढती संख्या आणि गुणवत्तेचे निकष डावलून संस्थात्मक पातळीवर होणारी प्राध्यापकांची ‘भरती’ राज्यातील उच्च शैक्षणिक वर्तुळातील दुरवस्थेसाठीचे महत्त्वाचे कारण बनले आहे.

घरकाम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार

$
0
0
घरकाम करणाऱ्या तरूणीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुसगाव येथे नुकताच हा प्रकार घडला. रामभाऊ माने (वय ५०, रा. काळुबाई मंदिराजवळ, सुसगाव, ता. मुळशी) असे गुन्हा नोंदवण्यात आलेल्याचे नाव आहे.

चिखलीत गोदामे व झोपड्या भस्मसात

$
0
0
कुदळवाडी-चिखली येथील भंगार मालाच्या आठ गोदामांना आणि कामगारांच्या झोपड्यांना बुधवार (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये गोडाऊनमधील सर्व भंगारमाल जळून खाक झाला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images