Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हडपसरमध्ये गोडाऊनला आग

0
0
हांडेवाडी रोड चिंतामणीनगर येथील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले. या आगीमुळे शेजारील जैन टाउनशिपमधील तीन फ्लॅटमधील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची दुर्दशा

0
0
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील दिवे घाटाचा रस्ता संपूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, या रस्त्यावर वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे.

नागरी समस्यांनी औंधचे नागरिक त्रस्त

0
0
पाणी, वाहतूक, झोपडपट्ट्या, उद्याने, भाजी-मंडई, अपघातमुक्त रस्ते अशा अनेक वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने औंध-बाणेर, पाषाण परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

स्वच्छतेसाठी प्रतिगुंठा १००० रु.

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील खासगी मोकळ्या जागा व रिकाम्या प्लॉटमधील स्वच्छतेसाठी संबंधित जागा मालकांकडून नियोजित प्रतिगुंठा एक हजार रुपयांचा दराबाबत फेरविचार करण्याची मागणी खुद्द प्रशासनाकडून स्थायी समितीकडे करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्येही BRT ची दुरवस्थाच

0
0
शहरात उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गाची व बसस्थानकाची मोठी दुरवस्था झाली आहे. एकीकडे बीआरटीएस व्यवस्थित चालण्यासाठी या मार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नुकतेच जाहीर केले.

‘माननीयां’च्या कामालाच प्राधान्य

0
0
कोणत्याही सरकारी कार्यालयात प्रमाणापेक्षा अधिक विनवणी, हातापाया पडल्याशिवाय सामान्य गरीब जनतेचे काम झाल्याचे आतापर्यंत ऐकिवात नाही. त्याला रेशनिंग कार्यालयेदेखील अपवाद राहिली नाहीत.

फ्लाइंग ऑफिसरचा मृत्यू

0
0
लोहगाव रोडवरील पठाणशहा दर्ग्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत हवाई दलातील फ्लाइंग ऑफिसरचा मृत्यू झाला. या ​अधिकाऱ्यासमवेत असलेली व्यक्ती या अपघातात जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

महिलेच्या साखळीची पद्मावती येथे चोरी

0
0
पद्मावती येथील मंदार सोसायटीजवळून सोमवारी सकाळी पायी जात असलेल्या ६४ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवेश परीक्षांचा ‘निकाल’ कधी?

0
0
शैक्षणिक अभ्यासक्रम एक, प्रवेश परीक्षा अनेक... प्रवेश परीक्षेचा प्रकार एक आणि त्यासाठीच्या अभ्यासक्रमांचे प्रकार मात्र अनेक... व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरच्या अशा संभ्रमाच्या वातावरणाचा निकाल लावण्याची जबाबदारी आता उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पेलावी लागणार आहे.

एकोपा दहशतवाद्यांना नकोसे

0
0
‘भारतात वेगवेगळे संप्रदाय एकोप्याने राहतात, हे दहशतवाद्यांना नको आहे; आपल्याच देशातील काही जण दहशतवाद्यांना प्रोत्साहन देऊन मदत करीत आहेत, ही बाब भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

रेशन ऑ‌फिसांची राज्यभर तपासणी

0
0
मुख्यमंत्री आणि दहशतवाद्यांच्या नावाने बोगस रेशनकार्ड तयार करण्याच्या प्रकारानंतर रेशनकार्ड देण्यासाठी तयार केलेल्या नियमावलीची चोख अंमलबजावणी, रेशनच्या धान्याची उचल आणि वाटप, आर्थिक लेखे याची आता कडक तपासणी करण्यात येणार आहे.

नवविवाहितेची आत्महत्या

0
0
मानसिक, शारीरिक छळ करून नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणा-यापतीवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (ता. २) कासारसाई येथे ही घटना घडली होती. रोहिणी मुरकुटे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव असून, तिचा पती नवनाथ किसन मुरकुटे (वय ३०, रा. कासारसाई) याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पात्रातील रस्ता गाळातूनच

0
0
नदीपात्रात विठ्ठलवाडी ते वारजे रस्त्यासाठी पालिकेने भराव घातल्याची ओरड पर्यावरणवाद्यांकडून केली जात असली, तरी प्रत्यक्षात हा भराव नसून, नदीपात्रातून काढण्यात आलेला गाळच आहे.

नदीपात्रातील रस्ता मार्गी लागणार?

0
0
पर्यावरणवाद्यांचा विरोध, कोर्टाची स्थगिती यासारख्या कारणांपासून ते पालिकेची निष्क्रियता यामुळे सुमारे तीन ते साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या वारजे ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या नदीपात्रातील रस्त्याला आज, बुधवारी तरी राष्ट्रीय हरित लवादाचा (एनजीटी) ‘ग्रीन सिग्नल’ मिळणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

तुळशीबाग-मंडईतील खरेदी पडतेय महागात

0
0
नेहमीच गर्दीने तुडुंबणारी मंडई... फोनवर बोलून नुकताच फोन खिशात ठेवला होता... काहींची तर गाडीवर बसल्याबसल्याच खरेदी सुरू होती... कुणी हातातल्या पिशव्या सावरत जाणवण्याइतपत भोवती घोटाळणाऱ्या मुलांकडे फार लक्ष दिलेच नाही...

एरंडवण्यातील नागरिकांचा जेनरिक मेडिकलसाठी आग्रह

0
0
एरंडवणा भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी या भागात महापालिकेने जेनरिक औषधांचे मेडिकल सुरू करावे, अशी मागणी मनसेचे स्थानिक नगरसेवक अनिल राणे यांनी केली आहे.

इनामदार हॉस्पिटलवर पालिकेची ‘कृपादृष्टी’

0
0
महापालिकेला अंधारात ठेवत तब्बल पाच मजले बेकायदा पद्धतीने बांधणाऱ्या वानवडी येथील ‘इनामदार हॉस्पिटल’ वर महापालिकेने आपली ‘कृपादृष्टी’ कायम ठेवली आहे.

पुण्यासह १२ जिल्ह्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा

0
0
डेंगीच्या विरोधात उपाययोजना करण्यात अपयश आल्याने पुण्यासह १२ जिल्हा परिषदांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य खात्याने नोटीस बजावली आहे. डेंगीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना, जनजागृती आणि परिणामकारक उपचार या तिन्ही आघाड्यांवर काय कमतरता राहिली, याची माहिती कळवून परिस्थिती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना या नोटिशीद्वारे करण्यात आल्या आहेत.

कैद्यांनाही ‘आधार’ आधारचा

0
0
विविध गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या कारागृहातील सर्व बंदी कैद्यांना आता स्वतःची ओळख मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अकरा कारागृहात सात हजारांहून अधिक कैद्यांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत.

रयतेचे राज्य आणून दाखविनच

0
0
‘लोकसभेच्या यशानंतर मी अठरा खासदारांसह एकवीरा मातेच्या दर्शनासाठी आलो होतो. आता ६३ आमदारांना घेऊन पुन्हा देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. आणि यापुढे लवकरच १८० आमदारांना घेवून दर्शनासाठी येईन,’ अशी ‘भीष्मप्रतिज्ञा’ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कार्ल्याच्या एकवीरा मातेसमोर केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images