Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रत्यक्ष भेटीनंतरच मतदारयादीत नाव

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांबाबत संरक्षण मंत्रालयाकडून आदेश आल्यानंतर पुढील वीस दिवसांमध्ये मतदारयादी अद्ययावत केली जाणार आहे. मात्र, मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन बोर्डाच्या कर्मचाऱ्यांकडून खात्री करण्यात आल्यानंतरच यादीत समावेश होणार आहे.

शाळा फेरतपासणी आता पोलिस पहाऱ्यात?

$
0
0
नियमबाह्य विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या प्रक्रियेत अडचण ठरणारी फेरतपासणीची प्रक्रिया थांबविण्यासाठी विनाअनुदानित शाळांनी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनाच धमकावण्याचे प्रकार सुरू केले आहेत.

चौधरी धमकी : जेल अधीक्षकांना नोटीस

$
0
0
सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार राजेश चौधरीने कोर्टात सादर केलेल्या अर्जप्रकरणी जेल अधीक्षकांना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांच्या कोर्टाने ही नोटीस बजावली.

डेंगीची ‘रॅपिड टेस्ट’ सर्रास नको

$
0
0
ताप, थंडी, अंगदुखीसारखी लक्षणे आढळताच डेंगीचा ‘रॅपिड टेस्ट’ सर्रास करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रॅक्टिसला पालिकेच्या आरोग्य खात्याने चाप लावला आहे. एक लाखांपर्यंत ‘प्लेटलेट’ आल्यासच ‘रॅपिड टेस्ट’ करावी अन्यथा सर्रास टेस्ट करू नये, असा सज्जड दमच आरोग्य खात्याने डॉक्टरांना भरला आहे.

औंध, बाणेरमध्ये मनसेचा मोर्चा

$
0
0
बाणेर, औंध परिसरात डेंगीच्या समस्या सोडवण्याबाबत प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप करत, मनसेतर्फे सोमवारी मोर्चा काढून क्षेत्रीय कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले.

आमदार विजय काळे यांचा पुढाकार

$
0
0
डेंगीच्या पेशंटची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आमदार सरसावले आहे. डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेला आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, यासाठी शिवाजीनगरचे नवनिर्वाचित आमदार विजय काळे यांनी आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांची‌ भेट घेतली.

डेंगी निर्मूलनात आरोग्य खाते अपयशीच

$
0
0
पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांना डेंगीच्या डासांनी विळखा घातला असून त्याची लागण होणाऱ्या पेशंटची संख्या वाढत असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. चार वर्षांच्या तुलनेत डेंगीचे राज्यातील पेशंटचे यंदाच्या वर्षी दहा टक्क्यांनी प्रमाण वाढले आहे.

‘कारभाऱ्यां’ना ‘ताईं’नी विचारला जाब!

$
0
0
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले बीआरटी मार्ग वाहतुकीसाठी खुले होत नाहीत. ‘कारभाऱ्यां’च्या गेल्या काही वर्षांमधील या ‘कामगिरी’चा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना जाब विचारला.

अखेर अवतरल्या..‘खासदार ताई’!

$
0
0
नऱ्हे परिसरातील खाणींच्या परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या सोसायट्यांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेत या सर्व सोसायट्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यकच असल्याची स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली.

महापौरांचे ‘सीएम’ना पत्र

$
0
0
शहरातील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी मोशी येथील सरकारी खाणीची जागा मिळावी, अशी मागणी शहराच्या महापौरांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

योजनेला मान्यता अन् निधीलाही कात्री!

$
0
0
एकाच बैठकीत एका योजनेला मान्यता आणि दुसरीकडे त्या योजनेचा निधी काढून घेण्याचे अजब नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. एकाच कार्यपत्रिकेवर हे परस्परविरोधी विषय सादर झाल्याने स्थायी समितीच्या माननीयांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
नगर जिल्ह्यातील जवखेडे गावापाठोपाठ, पुणे जिल्ह्यातही हवेली तालुक्यात दलित कुटुंबातील विवाहितेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करून या घटनांमधील आरोपींना चार दिवसांत अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

‘भाकरी फिरल्या’ने धास्तावले अधिकारी!

$
0
0
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार पायउतार होऊन भाजपचे नवे सरकार सत्तारूढ झाल्याने बदलीच्या भीतीने अनेक अधिकारी धास्तावले आहेत. गेली कित्येक वर्षे एकाच जिल्ह्यात तळ ठोकून असलेल्या ‘शिक्काधारी’ अधिकाऱ्यांनी ‘चंद्रपूर’ची वारी टाळण्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

‘सुरक्षाकवच’ अद्याप कायम

$
0
0
माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्र्यांपासून त्यांच्या कुटुंबीयांभोवती पोलिस संरक्षणाचे कडे कायमच आहे. या माजी मंत्र्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ‘धाडसी’ निर्णय घेतले असल्याने त्यांना सत्ता गेल्यानंतरही संरक्षणाच्या पायघड्या घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

RTO त चौकशी केंद्रच नाही

$
0
0
मोठ्या प्रमाणावर नागरी सेवा दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात चौकशी केंद्रच अस्तित्वात नसल्याने, या ठिकाणी पहिल्यांदाच आलेल्या नागरिकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

शुल्क नियंत्रण कायदा कधी?

$
0
0
शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या भरमसाट फीमुळे होणारी विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी आवश्यक शुल्क नियंत्रण कायद्याची निर्मिती गेल्या कित्येक वर्षांपासून रखडली आहे.

‘रॅपिड टेस्ट’: ८०० रुपये घ्या

$
0
0
डेंगीची ‘रॅपिड टेस्ट’ करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर पालिकेच्या आरोग्य विभागाने ब्रेक लावला आहे. बाराशे ते दीड हजारापर्यंत आकारण्यात येणाऱ्या शुल्काऐवजी ८०० रुपये शुल्क घ्यावे, अशी सूचना महापालिकेने शहरातील खासगी डॉक्टर, हॉस्पिटल, लॅब चालकांना केली आहे.

शहर मनसेत बदलांचे वारे

$
0
0
पुणे महापालीकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत वेगाने धावलेल्या मनसेच्या इंजिनाचा वेग नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत संथ झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दुर्लक्ष, पालिकेत पक्षाच्या नगरसेवकांची असलेली निष्क्रियता आणि अंतर्गत राजकारण यामुळे मनसेची ही अवस्था झाली आहे.

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणाऱ्या गावांमधील अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्यांची यादी नागरिकांसाठी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सोमवारी घेतला. येत्या पंधरा दिवसांत पाहणी पूर्ण झाल्यानंतर या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरेंचे 'मिशन १८०'!

$
0
0
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांना सोबत घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकवीरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी १८० आमदारांना घेऊन लवकरच पुन्हा दर्शनाला येईन, असा निर्धार केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images