Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डेंगीची डॉक्टरांनाच लागण

0
0
सासवड येथील ग्रामीण रुग्णालयायातील अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णालयातील दोन मुख्य डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना डेंगीची लागण झाली आहे. ग्रामीण रुग्णालयाला लागूनच पुरंदर पंचायत समिती आणि अन्य विभाग कार्यालये आहेत. तेथेही अस्वच्छतेचेच साम्राज्य असल्याने डेंगीची प्रादुर्भाव वाढत आहे.

पर्यटकांना मावळची भुरळ

0
0
पर्यटन आणि वर्षाविहारासाठी नावलौकिक असलेली लोणावळा-खंडाळा आणि मावळातील पर्यटन स्थळे दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली आहेत. लोणावळा-खंडाळ्या बरोबरच मावळालाही पर्यटकांची पसंती मिळत आहे.

अपघातग्रस्त कुटुंबीय वाऱ्यावरच

0
0
नऱ्हे येथील पिताराम कॉम्प्लेक्समधील अपघातग्रस्त कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने वाऱ्यावरच सोडून दिले आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी घटनास्थळी हजर राहण्याऐवजी संबंधित अधिकारी इतर ठिकाणच्या बंदोबस्तामागे गेल्याने अपघाताला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही अपघातग्रस्त कुटुंबीय अद्यापही जिल्हा प्रशासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत.

दलित महिलेवर बलात्कार

0
0
​पुणे-सासवड रस्त्यावरील वडकी गावात दलित समाजातील विवाहित महिलेवर दोघा चोरट्यांनी बलात्कार केल्याचे शनिवारी सायंकाळी उघड झाले. घरफोडी करण्याच्या उद्देशाने आलेल्या या दोन गुन्हेगारांच्या तपासाकरिता पोलिसांनी चार पथके नेमली आहेत.

रोहनने पार केली हवाई खाडी

0
0
जगात पोहण्यासाठी सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या सात समुद्रखाड्यांमधील तिसरी खाडी पार करण्यात पुण्याच्या रोहन मोरेने यश मिळविले आहे. हवाई येथील मोलकोई बेटांवरील ४२ किलोमीटर लांबीची ही खाडी रोहनने १७ तास २८ मिनिटांत पोहून पार केली.

विचित्र अपघातात पाच जखमी

0
0
गहुंजे येथील सुब्रतो रॉय स्टेडिअम समोर सोमवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास तीन मोटारींचा झालेल्या विचित्र अपघातात पाचजण जखमी झाले. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ (एमएच ४६-पी९४०१) गाडीचे पुढचा पुढचा टायर अचानक फुटला.

श्रीकर परदेशींची पुन्हा नियुक्ती करा

0
0
डॉ. श्रीकर परदेशी यांच्या तडकाफडकी बदली झाल्यानंतर आलेल्या नव्या आयुक्तांच्या सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर भूमिकेमुळे शहराती प्रगती उलट्या दिशेने सुरू आहे, असा आरोप करीत महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. श्रीकर परदेशी यांना पुन्हा नियुक्त करा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

मराठी-हिंदी भाषकांना जोडणार घुमान संमेलन

0
0
घुमान येथे होणार्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी आणि हिंदी भाषेतील पूल बांधण्याचे काम होणार आहे. त्यामुळे या संमेलनातून मराठी पाऊल पुढे पडावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य यांनी व्यक्त केली आहे.

अनधिकृत बांधकामांबाबत सूचना द्या

0
0
शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी तसेच भविष्यात अशी बांधकामे होऊ नयेत, याबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी लेखी उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.

अत्याचार : बाप-लेकावर आरोपपत्र

0
0
शिरूर येथील शासकीय बालगृह संस्थेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बाप-लेकावर शिरूर पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. शब्बीर ए. बाले (५२) व बबलू शब्बीर बाले (२०, दोघे रा. शासकीय मुलींचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह, शिरूर) या दोघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा

0
0
भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी पिस्तूलाचा धाक दाखवून सराफ व्यापाऱ्याकडून सुमारे दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने तीन चोरट्यांनी लुटले. सोलापूर रस्त्यावरील रविदर्शन सोसायटीतील सोनगिरा ज्वेलर्समध्ये ही घटना घडली.

समस्यांची अखंड मालिका

0
0
हडपसर उपनगर तेथील समस्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. येथील नेत्यांनी विकासासाठी प्रयत्न केले. मात्र, नियोजनबद्ध आणि दूरदृष्टी ठेवून एकही प्रयत्न न केल्याने वेगवेगळ्या प्रश्नाचा गुंता या मतदारसंघात निर्माण झाला आहे.

पर्यटनवृद्धीसाठी पालिकेची ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’ मोहीम

0
0
शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’ अंतर्गत विविध प्रकल्प पालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहेत. हेरिटेज व्हिलेज, हेरिटेज गॅलरी यापासून ते शहरातील पुलांच्या सुशोभीकरणापर्यंत १० ते १२ प्रकल्पांवर सुमारे १५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, याद्वारे आर्थिक विकास आणि स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सोनसाखळी हिसकावली

0
0
लोहगाव परिसरात रविवारी संध्याकाळी सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तोडून चोरून नेली.

BSNL ची जवळपास ५० टक्के दरवाढ

0
0
भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) लँडलाइन आणि ब्रॉडबँडच्या दरामध्ये वाढ केली असून, ही दरवाढ एक नोव्हेंबरपासून लागू झाल्याचे ‘बीएसएनएल’कडून सांगण्यात आले. सध्या असलेल्या बेसिक १०० या प्लॅनचे टेरिफ १०० रुपयांऐवजी आता १४० रुपये करण्यात आले आहे.

आता कँटोन्मेंटमध्येही LBT सुरू

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यास विरोध करणाऱ्या १३२ हरकती आणि सूचना आल्यानंतरही बोर्डाने पुणे महापालिकेच्या धर्तीवर ‘एलबीटी’ लागू करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. संबंधित प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी रक्षा मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

दस्त नोंदणीची कथा

0
0
दस्त नोंदणीसाठी आपला क्रमांक येण्याचा प्रतीक्षेत असलेले आणि आपली कागदपत्रे तपासणारे नागरिक... दस्तांची नोंदणी करून घेणारे कर्मचारी.. कायदेशीर पूर्तता करण्याच्या गडबडीत असलेले वकील.. शांतपणे चाललेला सगळा व्यवहार...

शांतता... कोर्टाचे बांधकाम सुरू आहे!

0
0
राज्यातील पहिले आणि नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केलेले पुण्यातील फॅमिली कोर्ट अद्यापही हक्काच्या जागेत स्थलांतर होण्याच्या प्रतिक्षेत आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ फॅमिली कोर्टासाठी उभारण्यात येत असलेल्या इमारतीचे बांधकाम गेली सहा वर्षे संथगतीने सुरु आहे.

चंदन पळविणारा ट्रक पकडला

0
0
सोलापूर रोडने मुंबईच्या दिशेने सुमारे २० लाख रुपयांचे चंदन ​ट्रकमधून घेऊन निघालेल्या दोन आरोपींना खडक पोलिसांनी सेव्हन लव्हज् चौकात रविवारी अटक केली. या आरोपींनी एका आयशर ट्रकमध्ये साडेसहाशे किलो चंदनाची लाकडे लपवल्याचे उघड झाले आहे.

हायवेवर समजणार पुढच्या गावची ‘हवा’

0
0
हायवेवरून जाताना पुढील गावांमध्ये वादळ आहे की पाऊस आहे, याची माहिती लवकरच वाहनचालकांना मिळणार आहे. हायवेवरील गावांच्या हवामानाच्या स्थितीची माहिती देणारी यंत्रणा हवामान विभागातर्फे विकसित करण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images