Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पिताराम : 3 जणांना कोठडी

$
0
0
नऱ्हे येथील पिताराम कॉम्प्लेक्स कोसळल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी ​अटक केलेल्या तिघांना सहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

‘सब कुछ बिकता है’ पडले महागात

$
0
0
‘मोबाईल पर सब कुछ बिकता है’ या टीव्हीवरील जाहिरातीला भुलून आपली कार चुटकीसरशी विकायला गेलेल्या दौंड तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक तरुणाला भलताच मनस्ताप सहन करावा लागला. गाडीची किंमत सोडाच; पण ती परत मिळवतानाही त्याची दमछाक झाली.

उद्योगांच्या खेडमध्ये समस्यांचा डोंगर

$
0
0
खेड तालुक्याचे नवे आमदार सुरेश गोरे यांना ‘आपला माणूस’ म्हणून तालुक्यातील जनतेने मनापासून साथ दिलेली असली तरी गोरे यांना तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित पडलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करताना मोठया आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

दर्शिले खूनप्रकरणातील आरोपींना अटक

$
0
0
प्रेमसंबंधातील अडथळ्याबरोबरच आर्थिक बाबतीतही वारंवार आडकाठी आणत असल्याच्या कारणावरून शिवसेनेचे ताथवडे पुनावळे विभागप्रमुख राजेश ऊर्फ राजाभाऊ दर्शिले यांचा सराईत गुन्हेगार मित्रांच्या मदतीने गोळ्या झाडून खून केल्याची कबुली सचिन सुदाम कुदळे याने पोलिसांना दिली.

‘YCM’च्या डॉक्टरांची सरसकट पगारवाढ

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल (वायसीएम) मधील डॉक्टरांची कमतरता, पेशंटचे होणारे हाल आणि एकंदरीत हॉस्पिटलच्या कारभारावर तोडगा काढण्यासाठी तसेच कामातील सुधारणा होण्यासाठी येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला आहे.

ऐतिहासिक वारसा जपणारी ‘माइलस्टोन मेमरी’

$
0
0
चौल ते पैठण हा सातवहनकालीन राजमार्ग असलेल्या नाणेघाट मार्गावर जुन्नरमध्ये प्रवेश करतानाचा एक माइलस्टोन इतिहासाच्या पाऊलखुणा अजुनही जपून आहे. जुन्नर ते कल्याण ५६ मैल, म्हणजेच ८४ किलोमीटर असल्याचा संदर्भ येथे मिळतो.

हडपसरच्या रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा

$
0
0
हडपसरमधील १ हजार ४११ फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण झाल्यानंतर आता महापालिकेने ‘नो हॉकर्स झोन’मधील वाहतुकीला अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवून त्यांचे पर्यायी जागांवर पुनर्वसन करावे, अशी मागणी हडपसरमधील नागरिकांकडून होत आहे.

अनधिकृत बांधकामे रोखण्याच्या शिफारसी कागदावरच

$
0
0
पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांलगतच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या स्वाधीन क्षत्रिय समितीच्या अहवालातील शिफारशी अंमलबजावणीअभावी कागदावरच राहिल्या आहेत.

खाणींचा परिसर असल्यामुळे पाया ठिसूळ

$
0
0
पुणे महापालिकेच्या हद्दीलगत वेगाने विकसित होणारा नऱ्हे-आंबेगावचा परिसर पूर्वी खाणींचा परिसर म्हणूनच ओळखला जात असल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे. नऱ्ह्यामधील पिताराम कॉम्प्लेक्सच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही माहिती पुढे येत असून, पूर्वी नऱ्ह्यातील खाणींच्या परिसरात आता अनेक इमारती उभारण्यात आल्याचेही याच माहितीमधून समोर येत आहे.

पेस्ट कंट्रोल कंपनीचा मालकच जबाबदार

$
0
0
पेस्ट कंट्रोलमध्ये वापरलेल्या विषारी औषधाच्या वासाने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ ऑक्टोबर २०१२ रोजी शनिवार पेठेत घडली होती. या प्रकरणी पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यात गोदामातून ८० लाखांचा ऐवज चोरी

$
0
0
किराणा माल, सिगारेट व सौंदर्य प्रसाधनांच्या गोडाउनचा लोखंडी पत्रा उचकटून ८० लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कोंढवा बुद्रूक येथे ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी पियुष जालान (वय ३७, रा. रविवार पेठ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दलितांवरील अत्याचाराच्या घटना पुन्हा घडणार नाहीत

$
0
0
‘नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता नाही, तर या प्रकरणातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे महत्त्वाचे आहे,’ असे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी स्पष्ट केले.

संघाचा स्वयंसेवक असल्याचा अभिमान

$
0
0
‘आता मंत्री झालो असलो, तरी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर स्वयंसेवक असल्याचा मला अभिमान आहे. स्वयंसेवक म्हणून आज झालेला सत्कार मला घरचा, हक्काचा सत्कार वाटतो,’ अशा शब्दात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कँटोन्मेंटची निवडणूक ११ जानेवारीला घेणार?

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे सोपस्कार पार पडल्यानंतर आता देशातील कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकांचे बिगूल वाजू लागले आहेत. येत्या ११ जानेवारीला निवडणुका घेण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत आता सायबर गुन्ह्यांचेही विश्लेषण

$
0
0
न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळा संचनालयातर्फे राज्यातील सर्व न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळांमध्ये सायबर क्राइम आणि व्हाइस अॅनालिसिससाठी लॅब सुरू करण्याचा विचार प्रस्ताव आहे.

पुण्याच्या रोहनने पार केली मोलकोई खाडी

$
0
0
जगात पोहण्यासाठी सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या सात समुद्रखाड्यांमधील तिसरी खाडी पार करण्यात पुण्याच्या रोहन मोरेने यश मिळविले आहे. हवाई येथील मोलकोई बेटांवरील ४२ किलोमीटर लांबीची ही खाडी रोहनने १७ तास २८ मिनिटांत पोहून पार केली.

डाळी कडाडल्या

$
0
0
दिवाळीचा सण आनंदात साजरा केल्यानंतर खाद्यपदार्थांमधील तूरडाळ, हरभराडाळ, मटकी आदी डाळींच्या भावात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. तर मूग डाळीमध्ये क्विंटलमागे एक हजार रुपयांची भाववाढ झाली आहे.

फळभाज्या महागल्या

$
0
0
मध्यंतरी झालेल्या पावसामुळे वाया गेलेली पिके, हळूहळू वाढलेली थंडी यामुळे रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक घटली. फळभाज्यांचे दर दहा किलोमागे दहा ते वीस टक्क्यांनी वाढले असून, गेल्या आठवड्यात वाढलेले कांदा, बटाट्यासह लसणाचे दर स्थिर आहेत.

डासोत्पत्तीचे केंद्र आढळल्यास दंड

$
0
0
डेंगीचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली असून, बांधकामांच्या ठिकाणी डासोत्पत्तीची केंद्र आढळल्यास बांधकाम व्यावसायिकांना दहा हजार, तर घर अथवा सोसायटीमध्ये नागरिकांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिली.

अग्निशमन यंत्रणा ‘ऑफ ट्रॅक’च

$
0
0
पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे रविवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. या इमारतीचा हेरिटेज वास्तूमध्ये समावेश असल्याने येथ ‘फायर आउटलेट’ बसविणे शक्य नाही. मात्र, येथील कार्यालयात फायर सिलिंडरही नाहीत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images