Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साहित्य संमेलन निवडणुकीत महिला मतदार अत्यल्प

$
0
0
समाजात स्त्री-पुरुष समानतेचा जागर केला जात असताना साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये महिला मतदारांची संख्या २५ टक्क्यांपेक्षाही असल्याचे स्पष्ट झाले आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण १०७० मतदार मतदार करणार असून, त्यामध्ये महिलांची संख्या केवळ २४८ आहे.

NFIचा सुवर्णमहोत्सव झाकोळला

$
0
0
भारतीय चित्रपटसृष्टीचा अनमोल ठेवा संग्रही असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा (एनएफएआय) सुवर्णमहोत्सव झाकोळला आहे. भारतातील महत्त्वाची संस्था असूनही अपुरे मनुष्यबळ, अत्याधुनिक तंत्रज्ञान या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे आठ महिने उलटून गेल्यानंतरही सुवर्णमहोत्सवी वर्षातील एकही कार्यक्रम झालेला नाही.

पुण्याच्या माजी नगसेवकांनाही पूर्ण वैद्यकीय सवलत

$
0
0
पुणे पालिकेच्या विद्यमान नगरसेवकांना मिळणाऱ्या वैद्यकीय लाभाप्रमाणेच आता माजी नगरसेवकांनाही वैद्यकीय साह्य योजनेतून शंभर टक्के सवलत मिळणार आहे. महिला व बालकल्याण समितीने त्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

चोरडिया आत्महत्येची सखोल चौकशी

$
0
0
पंचशील हॉटेल समूहाचे चेअरमन अजय चोरडिया यांच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील बांधकाम परवाना आणि नगरविकास विभागातून काही कागदपत्रे मागविली आहेत.

राज्य सहकारी बँकेला कोट्यवधींचा तोटा

$
0
0
नक्त मूल्य उणे (निगेटिव्ह नेटवर्थ) असलेल्या साखर कारखान्यांना कर्जपुरवठा, विनातारण कर्जे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन अशा विविध कारणांमुळे राज्य सहकारी बँकेला एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक तोटा झाल्याचे समोर आले आहे.

माळीणमध्ये अंधारातच दिवाळी

$
0
0
माळीणमध्ये यंदा ना पणत्या उजळल्या, ना फटाके वाजले. मृतांच्या आठवणींनी ग्रामस्थ, नातेवाइकांच्या मनाचे बांध मात्र फुटले. त्यामुळे गावची अवस्था ‘प्रकाशाची दिवाळी, पण त्याला अश्रूंची काजळी’ अशी झाल्याचे दिसून आले.

माळीणचे तरुण नोकरीवर गैरहजर

$
0
0
माळीणमधील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांमधील तरुणांना मर्सिडीज, महिंद्रा अँड महिंद्रा अशा नामवंत कंपन्यांमध्ये नोकऱ्या देऊ करण्यात आल्या आहेत. परंतु, निवड झालेले तरुण नोकरी स्वीकारत नसल्याचे आढळून आले आहे.

ATM ठरताहेत पांढरा हत्ती

$
0
0
बँकांमधील स्पर्धेच्या युगात धडाक्यात सुरू केलेली ‘एटीएम’ केंद्र आता पांढरा हत्ती ठरू लागली आहेत. एटीएम चालविण्यासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा त्यातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने ती चालविणे बँकांना डोईजड होऊ लागले आहे.

पुण्यात डेंगीचा ताप

$
0
0
पुणे शहरात आढळणारा ताप हा डेंगीचाच असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) महापालिकेला दिला आहे. शहरात तापाने फणफणणारे जे पेशंट सापडत आहेत, त्यांना येणारा ताप हा डेंगीचाच आहे, असे एनआयव्हीने स्पष्ट केले आहे.

घरोघरी डेंगीसाठी तपासणी

$
0
0
डेंगीचा ‘ताप’ रोखण्यासाठी महपालिकेने ‘मिशन फाइव्ह डे’ मोहीम हाती घेतली असून, त्याद्वारे शहरातील प्रत्येक घरात जाऊन डेंगीच्या डासांच्या उत्पत्तीची केंद्रे तपासली जाणार आहेत. ही केंद्रे आढळल्यास तेथे प्रतिबंधक औषध फवारणी केली जाणार आहे.

'अँटी करप्शन' RTIच्या कक्षेत

$
0
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागास (अँटी करप्शन) माहिती अधिकाराच्या कायद्यातून वगळण्याचा निर्णय राज्यपाल विद्यासागर राव यांनी रद्दबातल ठरविला आहे. माहिती अधिकार (आरटीआय) चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर गुरुवारी त्यांनी सरकारला या संदर्भातील आदेश दिले.

पुण्यात पाच मजली इमारत कोसळली

$
0
0
पुण्‍यातील नरहे-आंबेगावमधील भुमकर मळा येथे बांधकाम सुरू असलेली पाच इमारत कोसळली असून त्याच एक व्‍यक्‍त अडकली असण्‍याची भीती अग्‍नीशमन दल आणि बचाव पथकाकडून व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

रिक्षाचालकाचा खून

$
0
0
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात सात रिक्षाचालकांनी एका रिक्षा चालकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. पिंपरीतील डिलक्स चौक येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. राजेश राजू जाधव (२८, रा. डिलक्स टॉकीजजवळ, पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पिंपरीत एका रात्रीत दोन खून

$
0
0
धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या मंगेश आलटे याचा मृतदेह नातेवाइकांनी शुक्रवारी दुपारी पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर आणून ठेवला. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मंगेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला.

पुणे शहरात थंडीचा कडाका कायम

$
0
0
शहर आणि परिसरात थंडीचा कडाका कायम असून, शुक्रवारी पारा आणखी घसरला. पुण्यात १३.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील नीचांकी १३.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद साताऱ्यात झाली.

पिंपरीत डेंगीचा प्रादुर्भाव कायम

$
0
0
महापालिकेने विविध उपाययोजना राबवूनही शहरात डेंगीचे थैमान अजूनही सुरूच आहे. डेंगीच्या पेशंटची संख्या सातत्याने वाढत आहे. चालू वर्षी आतापर्यंत डेंगीचे तब्बल एक हजार ७५३ संशयित पेशंट आढळून आले आहेत.

‘सब कुछ बिकता है’ पडले महागात

$
0
0
‘मोबाईल पर सब कुछ बिकता है’ या टीव्हीवरील जाहिरातीला भुलून आपली कार चुटकीसरशी विकायला गेलेल्या दौंड तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक तरुणाला भलताच मनस्ताप सहन करावा लागला.

‘जवखेडे’च्या निषेधार्थ रास्ता रोको

$
0
0
अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे गावातील तिहेरी हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी मावळ तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोणावळा आणि सोमाटणे फाटा येथे जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

बालेकिल्ला राखला; मताधिक्य मात्र घटले

$
0
0
देशभरात आलेल्या मोदी लाटेत बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला काहीसे खिंडार पडले असले, तरी तो राखण्यात पवार काका-पुतण्याला यश आले आहे. मात्र, अजित पवार यांचा अश्वमेघ रोखण्याची क्षमता असल्याचे धनगर आंदोलन व उमेदवारांनी निवडणुकीत दाखवून दिले.

डेंगी आटोक्यात आणण्यासाठी पालिकेला ‘मनसे’ची साथ

$
0
0
शहरातील डेंगीची साथ आटोक्यात आणण्यासाठी पालिकेतर्फे सुरू असणाऱ्या उपाययोजनांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली आहे. तसेच, पालिकेला आवश्यक असलेली सर्व मदत मनसेतर्फे केली जाईल, असे पत्रच मनसेतर्फे पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images