Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बलात्कार: निगडीतील एकास अटक

0
0
लग्नाचे अमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. अशोक गणपत बनसोडे (३१ रा. त्रिवेणीनगर, निगडी), असे त्याचे नाव आहे.

त्रयस्थ संस्थांकडूनच हवे मूल्यांकन

0
0
चकाचक कॅम्पस आणि रंगरंगोटी केलेल्या इमारतींच्या बळावर देशातील विद्यापीठे आणि कॉलेजांचे होणारे मूल्यांकनावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शैक्षणिक संस्थांसाठी शिक्षण क्षेत्राबाहेरील त्रयस्थ संस्थांच्या माध्यमातूनच मूल्यांकनाची प्रक्रिया राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

ऐन दिवाळीत उपासमार

0
0
समाजकल्याण विभागाच्या संत ज्ञानेश्वर वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ आली आहे. सध्या वसतिगृहात ६० ते ७० विद्यार्थी राहत असतानाही दिवाळीच्या सुटीमुळे गेल्या दहा दिवसांपासून वसतिगृहाची मेस बंद ठेवण्यात आल्याचा आरोप वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केला.

आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

0
0
महापालिकेत वेगवेगळ्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या मुख्य इमारतीमध्येच सर्व विभागाच्या प्रमुखांना भेटणे शक्य व्हावे, यासाठी जागा निश्चित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते.

जलपर्णी करते सोन्याचे नॅनोपार्टिकल्स वेगळे

0
0
जलपर्णीसारखी वनस्पती टाकाऊ आणि त्रासदायक म्हणून परिचित असली; तरी याच वनस्पतीचा वापर करून सोन्याच्या द्रावणामधून सोन्याचे नॅनोपार्टिकल्स वेगळे करण्याची पद्धत शिवाजी नगरच्या मॉडर्न कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे.

बांधकामासाठी उद्यान विभागाचे ‘NOC मस्ट’

0
0
शहराच्या हद्दीत होणाऱ्या बांधकामांना यापुढे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भोगवटा पत्र (कम्प्लिशन सर्टिफिकेट) देण्यापूर्वी उद्यान विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. यामुळे, शहरात होणारी झाडांची बेसुमार कत्तल थांबण्यास मदत होणार आहे.

दिवाळी सरली... हुडहुडी भरली

0
0
दिवाळीबरोबरच येणाऱ्या थंडीची आता दिवाळीनंतर शहरात चाहूल लागू लागली आहे. बुधवारी शहरातील किमान तापमानाचा पारा १५.३ अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याने हुडहुडी भरली.

MIM’ हे पर्यायी राजकारणाचे पाऊल

0
0
राज्यात ‘मनसे’ संपल्याने थोडे हायसे वाटले असले, तरी ‘एमआयएम’च्या वाढत्या प्रभावामुळे चिंताग्रस्त झाल्याचे आम आदमी पक्षाचे नेते डॉ. योगेंद्र यादव यांनी बुधवारी स्पष्ट केले.

रानडे इन्स्टिट्यूटमध्ये डेंगीचे डास

0
0
शहराच्या सर्व भागात डेंगीच्या पेशंटची संख्या वाढत असतानाच मध्यवर्ती भागात असलेल्या फर्ग्युसन रोडवरील पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटच्या परिसरात बुधवारी डेंगीच्या डासांची उत्पत्ती केंद्र सापडली.

PMP प्रवाशांवर दरवाढीचा बोजा?

0
0
उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसविण्यात सपशेल अपयशी ठरल्याने महिन्यागणिक वाढणारा तोटा कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुन्हा प्रवाशांच्या खिशालाच हात घालण्याचे ठरविले आहे.

जवखेडे हत्याकांड पूर्वनियोजित

0
0
जवखेडे येथे जाधव कुटुंबीयांचे हत्याकांड हे पूर्वनियोजित कट असून यातून दलितांविषयी समाजात असलेली चीड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणातील गुन्हेगाराला तातडीने पकडून त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक न्याय परिषदेचे अध्यक्ष यांनी बुधवारी केली.

गल्लाभरू ‘चॅरिटी’ची चौकशी होणार

0
0
सामाजिक उपक्रमांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चॅरिटी शो’द्वारे खरेच ‘चॅरिटी’ झाली आहे काय, याची चौकशी आता करमणूक विभाग करणार आहे. चॅरिटीच्या नावाखाली करमणूक करातून सूट घेऊन आयोजित करण्यात येणाऱ्या अशा कार्यक्रमांमधून प्रत्यक्षात मात्र तारे-तारकांना नाचविले जात असून त्याद्वारे गल्लाभरूपणा केला जातो.

फटाक्यांचा ‘आव्वाज’ घटला

0
0
दिवाळीमध्ये रोषणाईच्या फटाक्यांची क्रेझ वाढत असल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचा ‘आव्वाज’ कमी झाला ठरला. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या नोंदीनुसार या दिवाळीत ध्वनीप्रदूषण सरासरी थोड्या प्रमाणात घटल्याची ‘गुडन्यूज’ पुणेकरांना मिळाली आहे.

एटीएम व्यवहार करा मोजूनमापून!

0
0
बँकांच्या एटीएम कार्डावरून केल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या संख्येवर मर्यादा घालतानाच आता एटीएम व्यवहारांच्या कक्षेतही बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ एटीएममधून पैसे काढल्यासच संबंधित व्यवहार हा एटीएम व्यवहार समजला जात होता. आता बॅलन्स तपासणे, पिन बदलणे आदी गोष्टीही एटीएम व्यवहार (एटीएम ट्रॅन्झॅक्शन) म्हणून गणले जाणार आहेत. त्यामुळे हे सारेच व्यवहार मोजून मापून करावे लागणार आहेत.

उलगडणार आस्वादक ‘भावगंध’

0
0
अर्थपूर्ण कविता आणि मधुर संगीत अशा साध्या कल्पनेतून जन्मलेली भावगीतांची परंपरा आहे. ७५ वर्षांच्या कालखंडात भावगीतांनी अनेक वळणं घेतली.

व्हायोलिनच्या सुरावटी अन् जुगलबंदी

0
0
व्हायोलिनच्या सुरावटी आणि तबला वादनाची अविस्मरणीय जुगलबंदी अशी अनोखी संध्याकाळ रसिकांनी नुकतीच अनुभवली. राजस उपाध्ये यांचं व्हायोलिन वादन तसंच नीलेश रणदिवे आणि पांडुरंग पवार यांच्या तबला जुगलबंदीला उपस्थितांची कडकडाटी टाळ्यांची दाद मिळाली.

सोहळ्यात भाज्या नॉन-ग्लॅमरस!

0
0
स्वतःच्या मोठ्या समारंभात मेन्यूमध्ये कोणती भाजी ठेवायची याच्या विचारात असाल, तर गवार, तोंडली, भेंडी, मटकी, कारली अशा भाज्या होऊन जाऊ द्या. आश्चर्य वाटून घेऊ नका; पण सध्या त्याचाच ट्रेंड आहे.

शिक्षणनिधीत महाराष्ट्र पिछाडीवर

0
0
केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या उच्च शिक्षण परिषदेचा फटका महाराष्ट्राला बसला असून, केंद्राच्या ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना’द्वारे (रुसा) मिळणाऱ्या निधीतील अत्यंत कमी वाटा राज्याला मिळाला आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशने तब्बल ३२ पट अधिक निधी मिळवित एक अब्ज रुपये पदरी पाडून घेतले आहेत.

भोसरी MIDCत वायू गळती

0
0
भोसरी औद्योगिक परिसरातील एका कारखान्याने अज्ञात रासायनिक वायू मोकळ्या हवेत सोडल्याने शेजारील कारखान्यातील कामगारांना मळमळण्याचा त्रास झाला. या कंपनीतील धातूच्या वस्तू, कंपनीच्या शेडवर तांबूस थर जमा झाला आहे.

PMP ठेकेदारांनी बुडविला LBT

0
0
पुणे शहरात आयात होणाऱ्या किंवा वापर होणाऱ्या कोणत्याही वस्तूवर स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरणे आवश्यक असतानाही, ‘पीएमपी’ला भाडेतत्त्वावर बस पुरविणाऱ्या ठेकेदारांनी आत्तापर्यंत एक रुपयाचाही कर पालिकेच्या तिजोरीत जमा केलेला नाही. उलट, ‘एलबीटी’ आम्हाला लागूच होत नसल्याचा दावा केला
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images