Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बापट, कुल, भेगडे देवेंद्र मंत्रिमंडळात?

$
0
0
नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुण्याला कोणते स्थान मिळणार, याबाबत तर्कवितर्क केले जात असतानाच फिल्डिंगही पक्की केली जात आहे.

PMP च्या सहाशे बस बंद

$
0
0
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे आश्वासन पुणेकरांना वारंवार दिले जात असले, तरी दिवाळीत आणि त्यानंतरही पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे सहाशेहून अधिक बस बंद अवस्थेत आहेत.

ATMमधून पैसे काढण्यावर मर्यादा

$
0
0
पाचपेक्षा अधिक वेळा ‘एटीएम’मधून पैसे काढायला गेलात, तर तुमच्या खिशाला आणखी कात्री बसण्याचा प्रकार आणखी काही दिवसांनी निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या ‘एटीएम’मधून महिन्यात पाच वेळा, तर इतर बँकांच्या ‘एटीएम’मधून तीन वेळा विनाशुल्क पैसे काढता येईल, असे मार्गदर्शक तत्त्व रिझर्व्ह बँकेने जारी केले आहे.

अजित पवारांना नोटीस

$
0
0
राज्य बँकेला झालेल्या अब्जावधींच्या तोट्याची जबाबदारी निश्चित करण्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह ६० ते ७० बड्या नेत्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

पुतळ्यांचे संग्रहालय बनवाःतेंडुलकर

$
0
0
‘शिल्पकाराने मोठ्या कष्टाने घडविलेले पुतळे प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्यावर थांबून पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे पुण्यातील शहरातील रस्त्यांवर असणारे सर्व पुतळे एकाच ठिकाणी उभारून त्यांचे संग्रहालय बनवावे,’ अशी सूचना ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी केली.

रेल्वेरूळ ओलांडताना विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0
रेल्वेचे रूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. कासारवाडी येथे बुधवारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय संजय अगरवाल (रा. कुंदननगर, कासारवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

पिंपरीत मध्यरात्री जाळपोळ

$
0
0
पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये अज्ञातांनी तीन मोटारी व एक दुचाकी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. वेळीच प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी पाणी टाकून आग विझवली.

पिंपरीतील ५०४ जणांना स्वस्त घरकुलाचा ताबा

$
0
0
केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत चिखली येथील स्वस्त घरकुल प्रकल्पातील एकूण ५०४ सदनिकांची संगणकीकृत सोडत बुधवारी महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते निघाली.

‘एलबीटी’ची गाडी अखेर रुळावर

$
0
0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये ‘एलबीटी’च्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांत ८४ कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

वाहतूक सुधारण्यासाठी दोन्ही पालिकांचा पुढाकार

$
0
0
‘बीआरटी’ मार्गावरील सार्वजनिक वाहतुकीसाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही महापालिकांनी एकत्रित येऊन वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लास्टिक बंदीला भीमाशंकरमध्ये हरताळ

$
0
0
भीमाशंकर परिसर आणि राजगुरुनगर शहरात प्रत्यक्षात प्लास्टिकबंदी अस्तित्वात असली तरी शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचेच असते. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग असून, अस्वच्छतेमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.

‘जवखेडे’च्या आरोपींना अटक करा

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावात दलित समाजातील हत्याकांडाप्रकरणी पुण्यातील विविध संस्था-संघटनांतर्फे आंदोलने करण्यात आली. या घटनेतील आरोपींनी त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

येरवड्यात डेंगीचा प्रादुर्भाव

$
0
0
पुणे शहरासह येरवडा उपनगरात मोठ्या प्रमाणावर डेंगीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. येरवडा कारागृह कर्मचारी वसाहतीमध्ये तीस पेक्षा अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना डेंगीची लागण झाली आहे.

सव्वा कोटीच्या विकासकामांना मंजुरी

$
0
0
देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एक कोटी तेवीस लाखांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये बोर्डाच्या सर्व मिळकतधारकांना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी दोन रंगाच्या बादल्या देण्यात येणार असून, यासाठी अकरा लाख नव्वद हजारांची निविदा मान्य करण्यात आली आहे.

ऊस दरनिश्चिती मंडळाचे सरकारकडे लागले डोळे

$
0
0
राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ऊस दराच्या निश्चितीसाठी नियुक्त केलेल्या मंडळाची नियमावली सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. राज्यातील गाळप हंगाम सुरू होण्याच्या बेतात असल्याने नव्या सरकारला प्राधान्याने हे काम हाती घ्यावे लागणार आहे.

‘आपला माणूस’ विजयी

$
0
0
गेल्या काही निवडणुकांत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात रंगणाऱ्या जुन्नर विधानसभेच्या आखाड्यात यंदा आश्चर्यकारक निकाल लागला. राज्यात चारीमुंड्या चीत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन केवळ जुन्नरमध्ये धावले.

सूस रोडवर सोनसाखळी चोरी

$
0
0
पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून चोरुन नेली. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सूस रोडवर विश्वकर्मा सोसायटीजवळ हा प्रकार घडला.

सहकारी संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये

$
0
0
लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकांपाठोपाठ आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. राज्यातील ‘ड’ वर्गातील सुमारे पाच हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

हिंदुत्ववादी संघटना युतीसाठी आग्रही

$
0
0
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या विचारधारेत साम्य असून त्यांची युती ही स्वाभाविक बाब आहे. तरीदेखील निवडणुकीच्या निकालानंतर दहा दिवसांनी हे अपेक्षित स्पष्ट निर्णय झालेला नाही.

लगाम लावूनही ट्रेकिंग संस्था मोकाट

$
0
0
दऱ्याखोऱ्यांतील भटकंतीच्या फोफावलेल्या फॅडला ‘नियमावलीत’ बसविण्याचा घाट सरकारने घातला असला तरी ट्रेकिंग संस्थांनी मात्र, या उपक्रमाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images