Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आरोग्य प्रमुखांचे निलंबन करा

$
0
0
शहरात डेंगीच्या पेशंटची संख्या वाढत असून, त्यावर नियंत्रण ठेवण्या‌त अपयशी झालेल्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करत शिक्षण हक्क मंचाने सोमवारी महापालिकेत आंदोलन केले.

‘लर्निंग लायसन्स’च्या रांगेत दिवस खर्ची

$
0
0
‘लर्निंग लायसन्स’ मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कार्यान्वित केलेल्या ऑनलाइन प्रणालीच्या मर्यादा वास्तवात उघड झाल्या आहेत. एका वेळी फक्त २५ जणांची परीक्षा घेण्याची सुविधा असल्याने सकाळी १० वाजताची ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतलेल्या ‘विद्यार्थ्यां’वर दुपारपर्यंत ताटकळत बसण्याची वेळ येत आहे.

शाळांकडून यंदाही शुल्कवाढीचे धोरण?

$
0
0
शुल्क नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक शालेय पातळीवरील शुल्क विनिमय समित्यांच्या कार्याची नेमकी माहितीच संबंधित समित्यांना नसल्याचे आता समोर आले आहे.

अँटी करप्शनच्या ‘रेड’ वाढल्या

$
0
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईचे प्रमाण गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षी दुपटीने वाढले आहे. गेल्या वर्षी एक जानेवारी ते २६ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत विभागातर्फे ४६० ठिकाणी छापे टाकण्यात आले होते; तर ठिकाणी छापे टाकून लाचखोरीची प्रकरणे बाहेर काढली आहेत.

आता कचरा बकेट माहितीसह

$
0
0
नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून वाटल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या बकेटवर प्रभाग क्रमांक, टेंडर क्रमांक, तसेच बकेट वाटल्याची तारीख टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बकेट वाटपात होणाऱ्या गैरकारभाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ही शक्कल लढविली आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी नाव वापरण्यापूर्वी परवानगी घ्या

$
0
0
शालेय पातळीवरील स्पर्धा परीक्षांसाठी राज्याचे वा राज्याच्या शिक्षण खात्याशी संबंधित यंत्रणांचे नाव वापरण्यासाठी यापुढे संबंधित यंत्रणांची किंवा राज्याच्या शिक्षण खात्याची परवानगी घेणे बंधनकारक केले जाणार आहे.

अतिरिक्त आयुक्तांनी उगारली छडी!

$
0
0
दिवाळीच्या सलग सुट्ट्यांनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अळम-टळम करत उशिरा कामावर हजर होणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.

सांगवीत विवाहितेला जाळून मारले

$
0
0
प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या विवाहितेला तिचा पती, सासू व त्याच्या प्रेयसीने रॉकेल ओतून पेटवून जाळून ठार मारल्याची घटना नवी सांगवीतील कवडेनगर परिसरात घडली. अर्चना अशोक भोर (वय ३८) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

खासदारांना आली डेंगीची आठवण

$
0
0
लोकसभेपाठोपाठ विधानसभेतदेखील पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात कौल दिल्यानंतर का होईना, भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांना पुणेकरांच्या हिताची आठवण झाली आहे.

नदीपात्रातील रस्त्यासाठी ११ कोटींची भरपाई

$
0
0
नदीपात्रालगतच्या रजपूत झोपडपट्टी ते कृष्णसुंदर गार्डन दरम्यानचा रस्ता करण्यास पालिकेने पुढाकार घेतला आहे. सिंहगडरोड, कर्वेनगर, कोथरूड भागातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणारा हा रस्ता तयार करण्यासाठी जागामालकांना नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

राडारोड्यात मुरमाची भर

$
0
0
‘नदीपात्रातील राडारोडा तातडीने काढून टाका,’ या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाचे पालन तर दूरच महापालिकेच्या ‘तत्पर’ अधिकाऱ्यांनीच बेकायदा काकासाहेब गाडगीळ पुलाखाली पात्रात गेल्या आठवड्यात तब्बल पन्नास डंपर मुरूम टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आश्वासन नको, पैसे द्या

$
0
0
आमची फसवणूक का केलीत’ असा सवाल करत ‘आश्वासन नको, पैसे द्या’, अशी मागणी करत भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी सोमवारी पतसंस्थेच्या अध्यक्षांना धारेवर धरले.

‘निलोफर’मुळे थंडीचा कडाका

$
0
0
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘निलोफर’ या अति तीव्र चक्रीवादळामुळे पुण्यासह राज्यातील ढगाळ वातावरण आणि थंडी कायम आहे. पुढील दोन ते दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’ ऐवजी बोचऱ्या थंडीचा अनुभव राज्यातील नागरिकांना घेता येणार आहे.

पुण्यात क्षेत्रीय वेदसंमेलन

$
0
0
पुणे : येथे ३१ ऑक्टोबरपासून तीन दिवसांच्या क्षेत्रीय वेदसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे आयोजन वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा, वेदभवन सांगता समारोहानिमित्त केले आहे.

उच्चशिक्षितांचा टक्का विधानसभेत वाढला

$
0
0
विधानसभेत यावेळेस प्रथमच उच्चविद्याविभूषित मंडळी मोठ्या संख्येने निवडून आली आहेत. या निवडणुकीतून २० डॉक्टर, दोन प्राध्यापक, आठ वकील आमदार नव्या विधानसभेत पोचले आहेत. त्यासोबतच ७० पदवीधर, २८ पदव्युत्तर आहेत. केवळ तीनच आमदार अल्पशिक्षित आहेत.

‘IIM’ अहवालाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

$
0
0
‘राज्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) येणे गरजेचे असून, त्याचे मुख्य केंद्र पुण्यात असावे,’ असा अहवाल सुमारे नऊ वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन तंत्रशिक्षण संचालक डॉ. एन. बी. पासलकर यांनी दिला होता.

शिक्षणनिधी : महाराष्ट्र पिछाडीवर

$
0
0
केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या उच्च शिक्षण परिषदेचा फटका महाराष्ट्राला बसला असून, केंद्राच्या ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना’द्वारे (रुसा) मिळणाऱ्या निधीतील अत्यंत कमी वाटा राज्याला मिळाला आहे.

अतिक्रमण कारवाईला पुन्हा जोर

$
0
0
दिवाळी संपताच, पालिकेने शहरातील अनधिकृत पथारी व्यावसायिकांविरोधातील कारवाईला पुन्हा सुरुवात केली असून, सोमवारी सारसबागेतील स्टॉल्सच्या सुमारे पन्नासहून अधिक शेड्स काढण्यात आल्या.

अजय चोरडिया यांची आत्महत्या

$
0
0
पंचशील हॉटेल समूहाचे अध्यक्ष अजय ईश्वरदास चोरडिया (वय ४८, रा. पुणे) यांनी चिंचवड येथील हॉटेल ‘डबल ट्री हिल्टन’ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी ही घटना घडली.

मोदीलाटेच्या संधीचे केले सोने

$
0
0
मतदारांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहचण्यासाठी केलेले योग्य नियोजन, विद्यमान आमदारांबाबत मतदारांच्या मनात असलेली नाराजी, काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनी केलेली मदत आणि मोदी लाटेचा प्रभाव यामुळेच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविण्यामध्ये पक्षाचे उमेदवार विजय काळे यांना यश मिळाले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images