Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मोनार्कबाबतच्या निर्णयाची चौकशी करा’

$
0
0
‘पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नव्हे, तर बिल्डरांच्या फायद्यासाठी मोनार्क संस्थेचा बीडीपीचा अहवाल स्वीकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पराभवाची जबाबदारी कुणाची?

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याने पक्षाच्या शहराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

पराभवाच्या रामायणावर घडले चिंतनाचे महाभारत

$
0
0
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंगळवारी जोरदार चकमकी झडल्या. शहरातील सर्वच मतदारसंघांत झालेल्या पराभवाची वेगवेगळी कारणे पुढे येऊ लागल्याने बैठकीत अनेकदा ‘तू-तू मैं-मैं ’ झाली.

मराठवाड्यात सर्वाधिक कमी पाऊस

$
0
0
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी मराठवाड्यावर मात्र या हंगामात दुष्काळाचे सावट असल्याचे समोर आले आहे.

कॉलेजच्या गमतीत रमले ‘आमदारसाहेब’

पुरंदर परिसरात फुलले झेंडूचे मळे

$
0
0
दसरा आणि दिवाळी या खास सणांसाठी मोठे महत्त्व असणारा झेंडू हे फुलपीक सध्या सर्वत्र घेतले जाते. शेतकऱ्यांना कमीतकमी दिवसांत आणि कमी पाण्यावर हमखास पैसे मिळवून देणारे हे पीक अत्यंत माफक खर्चात घेतले जाते.

फटाका स्टॉलची सुरक्षा ऐरणीवर

$
0
0
डेक्कन येथे नदीपात्रालगत असलेल्या फटाक्यांच्या स्टॉलजवळ महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची आगप्रतिबंधक उपाययोजना करण्यात आली नसल्याचे बुधवारी केलेल्या पाहणीत आढळून आले, तर गोळीबार मैदान व म्हात्रे पूल येथे असलेल्या स्टॉलजवळ खबरदारी म्हणून फायर ब्रिगेडचा प्रत्येकी एक बंब ठेवण्यात आला आहे.

पावणेपाच कोटी रुपयांची फसवणूक

$
0
0
शेअर मार्केटमध्ये भागीदारी करीत नफा कमावण्याच्या बहाण्याने सुमारे पावणेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

थ्री-डी मेक लॅब लवकरच पुण्यात

$
0
0
एखाद्या यंत्राच्या वा त्यातील एखाद्या विशिष्ट भागाच्या प्रतिमेवरून थेट तसेच्या तसे यंत्र वा भाग तयार करण्याची क्षमता असणारी ‘थ्री-डी मेक लॅब’ लवकरच पुण्यात उभी राहणार आहे.

डेंगीची हेल्पलाइन उरली नावालाच

$
0
0
डेंगी निर्मूलनासाठी महापालिकेने सुरु केलेल्या हेल्पलाइनवर नोंदविलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. डेंगीबाबत या हेल्पलाइनवर तक्रार नोंदविल्यास केवळ त्याची नोंद घेतली जाते, मात्र प्रत्यक्षात त्याची दखल घेऊन कार्यवाही केली जात नसल्याने हेल्पलाइन नावापुरतीच उरली आहे.

५ वर्षे ११ महिने?

$
0
0
पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी पाल्याचे वय किमान पाच वर्षे ११ महिने असावे, असा प्रस्ताव शिक्षण खात्याच्या विचाराधीन आहे. भाजपच्या सरकारने त्याला मान्यता दिल्यास नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पुढील वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

बारामतीत डेंगीच्या साथीचा कहर

$
0
0
राज्यात अनेक साथीच्या रोगांचे थैमान सुरू असतानाच काही दिवसांपासून डेंगीच्या साथीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या बारामतीत दिवसेंदिवस वाढतच आहे.

पालिकेच्या २ जागांसाठी पोटनिवडणूक

$
0
0
विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी पालिकेतील दोन नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या दोन जागांसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे.

धोकादायक जीएम पिके

$
0
0
‘आपल्या शेजारील गुजरातने जीएम चाचण्यांवर बंदी घातली असून महाराष्ट्र हे अशा चाचण्यांना अनुमती देणारे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्र हे धोकादायक जीएम पिकांची प्रयोगशाळा झाली आहे. शासन आपल्याला गिनिपिग समजते की काय?’ असा सवाल उपस्थित करून पर्यावरण अभ्यासक, कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञानी महाराष्ट्रात होत असलेल्या जीएम चाचण्यांवर बंदी आणावी, अशी मागणी केली.

चक्रावणारा निकाल

$
0
0
शक्यतांना धक्का देत पिंपरी मतदार संघातील मतदारांनी शिवसेनेच्या बाजुने कौल दिला आणि सर्वांच्याच निकषावर पाणी फिरवले.

उद्योगनगरीत लक्ष्मीपूजन

$
0
0
पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने घर, दुकान, ऑफिस आणि कंपन्यांमध्ये पूजापाठ करण्यात आले.

डेंगीचा उद्रेक

$
0
0
खडकी कँटोन्मेंट परिसरामध्ये दिवसेंदिवस डेंगीचे पेशंट वाढतच असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. खडकी हद्दीतील सरकारी हॉस्पिटल आणि सर्व खासगी हॉस्पिटल डेंगीच्या पेशंटनी भरलेले आहेत. बोर्डाच्या डॉ. आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एका खाटेवर दोन पेशंट अशी वेळ प्रशासनावर आली आहे, तर अतिदक्षता विभागात जास्त प्रमाणात पेशंट असल्याने जागा कमी पडत आहेत.

पुणेकर तापाने फणफणले

$
0
0
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे गेल्या काही दिवसांत डेंगीची लागण झालेल्या पेशंटची संख्या वाढत असून, गेल्या महिनाभरात शहरातील विविध भागांत डेंगीचे ३६३ पेशंट सापडले. चालू आठवड्यात ७० नवीन डेंगीचे पेशंट सापडले आहेत. यामुळे ऐन दिवाळीच्या सणात डेंगीच्या तापाने पुणेकर नागरिक फणफणले आहेत.

पोलिसालाच धक्काबुक्की

$
0
0
दोन ट्रकचालकांची भांडणे सोडवायला गेलेल्या वाहतूक पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार नगर रोडवरील वडगाव शेरी चौकात घडला. अखेर या वाहतूक पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने ट्रकचालकांना लॉकअपची हवा खावी लागली.

मोदी लाटेचाच करिष्मा

$
0
0
पंचरंगी लढतीत अटीतटीच्या सामन्याचे चित्र, ‘राष्ट्रवादी’ने केलेली जोरदार बांधणी, मनसेच्या इंजिनाने केलेली धावाधाव, शिवसेनेच्या बाणाला जातीय समीकरणांची किनार यामुळे कमळ पुन्हा फुलणार का, या शक्यतेबद्दल घेतल्या जाणाऱ्या शंकेला मोदी लाटेच्या करिष्म्याने चोख उत्तर दिले
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images