Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात ‘टक्का’ वाढला

$
0
0
विधानसभेच्या पंचरंगी निवडणुकीसाठी पुणे शहर व जिल्ह्यात बुधवारी ६२.५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कडक ऊन, दूरवरची मतदानकेंद्रे अशा समस्यांवर मात करीत नागरिकांनी भरघोस मतदान केले.

बारामतीमध्ये इर्षेने मतदान

$
0
0
बारामतीत विधानसभा मतदारसंघात दिवसभर मोठ्या उत्साहात मतदान झाले. सुमारे ६६ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यातही खुद्द बारामती शहरातील मतदानाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.

तंत्रज्ञानामुळे स्टॉल झाले पेपरलेस

$
0
0
मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी मतदार केंद्राच्या आवारात या वेळी विविध पक्षांचे टेक्नोसॅव्ही कार्यकर्ते पाहायला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीला लॅपटॉपवर नावे शोधणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठमोठ्या टॅबच्या साह्याने नागरिकांना मार्गदर्शन केले.

खडकीत काँग्रेस-NCP त हाणामारी

$
0
0
मतदानाच्या वेळी पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर मतदारसंघातील खडकी येथील काँग्रेसचे उमेदवार विनायक निम्हण यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कॅन्टोन्मेंट माजी नगरसेवक माऊली यादव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी हाणामारी झाली.

व्होट बँकांत ‘क्रॉस कनेक्शन’?

$
0
0
उमेदवारांचा संपर्क..., जात-धर्म-प्रांत...,उमेदवारांच्या बाजूने किंवा विरोधातील स्पिरीट.. आणि तुटलेली युती आघाडी...! राजकीय पक्षांच्या पारंपरिक व्होट बँकांच्या बरोबरीने यंदाच्या निवडणुकीत असे बहुरंगी पद्धतीने विचार करून मतदान होत असल्याचे जाणवल्याने मतदानाच्या दिवशी चित्र स्पष्ट होण्याऐवजी उलट अधिकच चक्रावून टाकणाऱ्या लढती होणार, यावरच बुधवारी शिक्कामोर्तब झाले.

राज्यातही ‘मोदी’ सरकार?

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत प्रकट झालेली ‘मोदी लाट’ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही कायम असल्याचे चित्र विविध ‘एक्झिट पोल’मधून बुधवारी दिसले. विधानसभेच्या २८८ जागांसाठी सुमारे ६४ टक्के मतदान झाले असून, भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज ‘एक्झिट पोल’नी वर्तवला आहे.

सुवर्णमहोत्सवी ‘कामायनी’

$
0
0
मतिमंद मुलांसाठी सिंधूताई जोशी यांनी १९६४ साली स्थापन केलेली कामायनी संस्था यंदा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. दरवर्षीप्रमाणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान अत्रे सभागृहात भरणार आहे. त्या निमित्त...

बरे झालेल्यांनी स्वबळावर उभे राहावे

$
0
0
‘मनोरुग्णाच्या आजारातून अनेक रुग्ण बरे होऊनही केवळ घरातील नातेवाइक घेऊन जात नसल्याने या रुग्णांना नाइलाजाने हॉस्पिटलमध्येच राहावे लागत आहे. अशा रुग्णांनी स्वबळावर उभे राहून समाजात स्थान निर्माण करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे मत जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आयझॅक यांनी व्यक्त केले.

‘सेट’चे वेळापत्रक ‘अपसेट’ होणार?

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील उमेदवारांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या स्टेट एलिजिबिलिटी टेस्टच्या (सेट) यंदाच्या आयोजनाला खो बसण्याची शक्यता आहे. यंदा अद्यापपर्यंत एकही ‘सेट’ झालेली नाही.

येत्या २८ डिसेंबरला ‘नेट’

$
0
0
यंदा प्रथमच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात येणारी ‘नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट’ अर्थात ‘नेट’ ही परीक्षा २८ डिसेंबरला होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरायचे असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

'सोफोश'च्या मदतीसाठी धावले पुणेकर…!

$
0
0
सोफोश या सेवाभावी संस्थेच्या मदतीसाठी तब्बल सहा हजार पुणेकर 'पुणे रनिंग' या स्पर्धेच्या माध्यमातून रस्त्यावर धावले. पुणे रनिंग कमिटी आणि दरोडे जोग प्रॉपर्टीज यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम पार पडला. या स्पर्धेत अनेक मुले, ज्येष्ठ, परदेशी तरुणांनी यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीत अपयश

$
0
0
गेल्या दशकात पुण्याचा विस्तार झाला. काही प्रमाणातील नियोजित विकासाबरोबरच जनतेच्या रेट्यामुळे शहराच्या सर्व बाजूंना उपनगरे वसली आहेत. काय आहे तेथील पायाभूत सुविधांची स्थिती? तेथील नागरिकांच्या महापालिका प्रशासनाकडून अपेक्षा काय आहेत?

मतदान वाढल्याने चुरस वाढली

$
0
0
भोसरी विधानसभा मतदान संघामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात सुमारे बारा टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे लढत चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारानेही विजयाचा दावा केला आहे.

यंदा अपेक्षा अनपेक्षित निकालाची

$
0
0
अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यातच चिंचवड विधानसभा, सांगवी,पिंपळे गुरव, वाकड, पिंपळे सौदागर व पिंपळे निलख येथील मतदान स्थानिक उमेदवारांना झाल्याने आपल्या गावाला यंदा संधी आहे.

मतदान घसरल्याचा फायदा कोणाला?

$
0
0
पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी मतदान झाल्यामुळे त्याचा फायदा, तोटा नेमका कोणाला होणार याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र, लोकसभेच्या तुलनेत मतदारांना बाहेर काढण्यात सर्वपक्षीय नेत्यांना अपयश आले, तसेच प्रशासकीय यंत्रणाही कमी पडल्याचे दिसून आले.

कामगारविषयक सुधारणांचे स्वागत

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजधानीत सादर केलेल्या उद्योग आणि कामगारविषयक सुधारणांचे पुण्यातील उद्योगविश्वातून स्वागत होत आहे. कालबाह्य होत असलेल्या कामगार कायद्याच्या पुनर्रचनेची मागणी मान्य झाल्याने आणि ‘इन्स्पेक्टर राज’मधून मुक्तता मिळण्याच्या शक्यतेमुळे उद्योगक्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

बच्चेकंपनीची स्वारी गड-किल्ल्यांवर

$
0
0
भव्य बुरूज, त्यावर अभिमानाने उभ्या असलेल्या तोफा, तटबंदीवरून दऱ्याखोऱ्यांवर नजर ठेवत गस्त घालणारी मावळ्यांची फौज, गडाच्या पायथ्याशी भरलेला बाजार, पाणी भरण्यासाठी घोळक्याने जाणाऱ्या गवळणी.. डोंगराच्या एखाद्या गुहेत परिसर न्याहाळत बसलेला वाघ, तर कुठे कुरणावर निवांत चरणारी जनावर..

दिवाळी अंकांमध्ये आता ‘प्रायोगिकता’

$
0
0
दर्जेदार साहित्यानुभव देणाऱ्या दिवाळी अंकांचा प्रयोगशीलतेच्या वाटेवरचा प्रवास सुरू आहे. पारंपरिक दिवाळी अंकाची चाकोरी मोडण्यासाठी दिवाळी अंकांमध्येही वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला जात असून, विविध विषयांना वाहिलेले ‌दिवाळी अंक प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

सारे काही फराळासाठीच...

$
0
0
गिरण्यांच्या बाहेरून जाताना येणारा भाजणीचा खमंग वास.. घरांमध्ये दरवळणारा रवा-डाळीचे पीठ भाजण्याचा, काही ठिकाणी चकल्या, शंकरपाळ्या तळणाचा, चिवड्याच्या फोडणीचा ‘टिपिकल’ वास...

‘मटा’च्या दिवाळी उत्सवात ‘प्रपोजल’

$
0
0
कल्याणला जाणाऱ्या शेवटच्या लोकलमधून ड्युटी संपवून घरी निघालेल्या कॉन्स्टेबल निवृत्ती पवारला ती कॉलगर्ल भेटली नसती, तर? किंवा राधा नावाच्या वेश्येच्या प्रवासात पुढे सबइन्स्पेक्टर झालेला तो कॉन्स्टेबल भेटला नसता, तर तिच्या आयुष्याला वेगळे वळण लागले असते? अशा प्रश्नांतच नाट्य दडलेले असते, आणि तिथेच नाटकाची सुरुवात होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images