Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मृत्यूच्या चक्रव्यूहातून सहीसलामत...

$
0
0
चिघळलेली परिस्थिती कंट्रोल रूमला सांगण्यासाठी मी वायरलेस घेताक्षणी जमावाने व्हॅनमधून मला बाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.. साक्षात मृत्यूच्या चक्रव्यूहात अडकलो होतो. पण.. एका अनामिकाच्या मदतीमुळे दैव बलवत्तर म्हणूनच मी वाचलो. मुंबईत आझाद मैदानाजवळ रझा अकादमीच्या मोर्चाच्यावेळी झालेल्या हिंसाचारातील जखमी कॉन्स्टेबल जाकीर शेख सांगत होते. त्यावेळी अंगावर अक्षरश: शहारे उभे राहत होते.

कम्पुटराइज्ड रेशनकार्ड मोहीम ऑफलाइन...

$
0
0
बोगस रेशनकार्डांना आळा घालण्यासाठी तसेच अन्नधान्याचे वाटप करताना होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी सुरु करण्यात आलेली ‘कम्पुटराइज्ड रेशनकार्ड’ मोहीम सध्या थंडावली आहे. गेल्या चार महिन्यात अवघ्या दीड ते दोन लाख कम्पुटराइज्ड रेशनकार्ड तयार करण्यात आल्या असून हाच वेग राहिल्यास शहरातील सर्व नागरिकांना कम्पुटराइज्ड रेशनकार्ड मिळण्यास पुढील वर्ष उजाडणार आहे.

अशोक रानडे यांना गौरव निधी अर्पण

$
0
0
‘संगीत समीक्षक हे काहीसे उपेक्षित क्षेत्र; पण त्याची मित्र फाउंडेशनने दखल घेतली आणि एका समीक्षकापलीकडेही श्रोता म्हणून माझा गौरव केला, याचा मला आनंद आहे,’ अशी भावना ज्येष्ठ संगीत समीक्षक अशोक श्रीराम रानडे यांनी व्यक्त केली.

एसटीचा ‘प्रासंगिक करार’ही महागला

$
0
0
एसटी महामंडळाकडून नैमित्तिक करारावर देण्यात येणाऱ्या बसेसच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. येत्या २२ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. साध्या बससेवेपासून ते वातानुकुलित बससेवेपर्यंतच्या दरामध्ये प्रतिकिलोमीटरमागे दोन ते नऊ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. साध्या बससेवेमध्ये करण्यात आलेली दरवाढ प्रतिकिलोमीटरला दोन ते सहा रुपयांदरम्यान आहे. त्यामध्ये ४०, ५०, ५५, ६६ आसनी बससेवेचा समावेश आहे.

बिले भरा ऑनलाइन

$
0
0
शहराच्या विविध भागांतील नागरिकांना ‘भारत संचार निगम लिमिटेड’ची (बीएसएनएल) लँडलाइन बिले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारींनी पुन्हा डोके वर काढले आहे. पोस्टाद्वारे बिले मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांनी वेबसाइटवरून बिले भरावीत अथवा ई-मेलद्वारे बिल मिळण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन ‘बीएसएनएल’ला करावे लागले आहे.

गुरूवारपासून चित्रपट महोत्सव

$
0
0
आशय फिल्म क्लब आणि जालान ग्रुपतर्फे ‘मेड इन पुणे’ या तीन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) येत्या गुरूवारी (२३ ऑगस्ट ) सायंकाळी सहा वाजता ‘रामशास्त्री’, शुक्रवारी (२४) दुपारी चार वाजता ‘अवघाची संसार’ तर शनिवारी (२५) दुपारी चार वाजता ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

एम्प्रेस गार्डनमध्ये साकारणार कलाविष्कार

$
0
0
परदेशातील बागांप्रमाणे एम्प्रेस गार्डनमध्येही कला केंद्र असावे, अशी अॅग्री हॉर्टिल्चरल सोसायटीची इच्छा प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी पूर्ण केली आहे. गार्डनमध्ये सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी बजाज यांनी एक कोटी रुपयांची देणगी संस्थेला दिली आहे. बजाज हे संस्थेचेही अध्यक्ष आहेत.

कंत्राट संपण्यापूर्वीच नवे टेंडर

$
0
0
‘न्याती इन्फोसिस’चे कंत्राट संपण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने नवीन कंत्राटदार नेमण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली. त्यानुसार आयबीएन टेक्नॉलॉजी या कंपनीला कंत्राट मिळाले. टेंडरची रक्कम २४ लाख ८३ हजार रुपये असून, त्यापैकी पाच टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून भरावी लागते.

पुण्यासह प. म. ऐच्छिक रक्तदानात मागे

$
0
0
रक्त संकलनात पुणे दुस-या क्रमांकावर असले, तरी प्रत्यक्षात पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर जिल्ह्यांची ऐच्छिक रक्तदान करण्यात पिछाडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या तुलनेत नंदुरबारसारख्या आदिवासी भागाने आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्ग, नाशिक या जिल्ह्यांनी देखील आपले वर्चस्व राखले आहे.

मतपत्रिका आजपासून पाठविणार

$
0
0
चिपळूण येथे होणा-या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदारांना मतपत्रिका पाठविण्यास येत्या मंगळवारपासून (२१ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. या मतपत्रिका ३१ ऑक्टोबरपर्यंत महामंडळाकडे पोहोचणे आवश्यक असून, एक नोव्हेंबरला संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर केली जाणार आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका जखमी

$
0
0
जुन्नर तालुक्यातील मटाले मळा (दत्तनगर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार वर्षांची बालिका जखमी झाली. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. समृद्धी रामदास मटाले असे त्या बालिकेचे नाव आहे.

चार दिवसांत ४१ गुन्हे

$
0
0
शहरात अनधिकृत बांधकामे करणा-या ४१ व्यक्तींवर गेल्या चार दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता महावीर कांबळे यांनी सोमवारी दिली.

सायबर पोलिस स्टेशनचा प्रस्ताव अजूनही हँगच

$
0
0
वाढत्या सायबर गुन्हेगारीचे टार्गेट बनलेल्या पुणे शहरसाठी स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या कारभारात गेले वर्षभर हँग झाला आहे. सध्या सुरू असलेल्या ‘सायबर वॉर’च्या पार्श्वभूमीवर हा विषय मार्गी लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खडकवासला प्रकल्पात २२.१२ TMC पाणीसाठा

$
0
0
शहर आणि परिसरातील पावसाचे प्रमाण सोमवारी कमी झाले. दिवसभर ढगाळ हवा कायम होती, पण पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, खडकवासला प्रकल्पातील धरणसाठा २२ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.

नागालँडचे मंत्री पुण्याच्या भेटीला

$
0
0
ईशान्येकडील नागरिकांच्या सु्रक्षिततेचा आढावा घेण्यासाठी नागालँड येथील दोन मंत्री आणि एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने सोमवारी कोंढव्याला भेट दिली. ‘ईशान्येकडील राज्ये ही प्रगतशील असून येथील तुलनेत शिक्षणाच्या संधी कमी आहेत. त्यामुळे आम्ही पुणे शहरावर अवलंबून आहोत,’ अशी भावना या शिष्टमंडळाने व्यक्त केली.

घरी परतण्याचा ओघ ओसरला

$
0
0
शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त पुण्यात असणा-या ईशान्य भारतातातील नागरिकांचा आपल्या गावी परतण्याचा ओघ ओसरला आहे. पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस मधून सोमवारी जेमतेम १०० ते १५० नागरिक आपल्या गावी रवाना झाले.

काश्मीर हो या गोहट्टी, अपना देश अपनी मिट्टी

$
0
0
‘काश्मीर हो या गोहट्टी, अपना देश अपनी मिट्टी’ या ओळींची आ‍‍ठवण करून देत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पुण्यातील ईशान्य भारतीय नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली.

परतण्याची घाई करू नका

$
0
0
पुण्यात राहणारे ईशान्यवासीय हे भारतीय आहेत. त्यांच्या मनातील भीती दूर झाली पाहिजे, असे सांगत पुण्यातील मुस्लिम बांधवांनी ईशान्येकडील नागरिकांनी घरी जाण्याची घाई करू नये, असे आवाहन केले आहे.

दरोड्याच्या तयारीत असलेले तिघे गजाआड

$
0
0
सिंहगड रस्त्यावरील श्री पुष्पक ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघा आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी गजाआड केले, तर दोघे आरोपी फरार झाले. आरोपींकडून कोयता, चॉपर, हॉकी स्टिक आणि मारूती व्हॅन असा एक लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सात लाखांचा गांजा जप्त

$
0
0
आंध्र प्रदेशातून पुण्यात विक्री करण्यासाठी आणलेल्या गांजाची दोन पोती अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केली. या प्रकरणी रास्ता पेठ येथील एका दाम्पत्यासह कार चालकाला अटक करण्यात आली असून कार आणि गांजा असा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>