Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोदीलाटेची कसोटी

0
0
महापालिकेपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुका हातात हात घेऊन लढणारे भाजप आणि शिवसेना परस्परांच्या विरोधात उतरल्याने यंदा कोथरूड विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत आहे.

मतविभागणीची चुरस

0
0
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बापू पठारे यांना विजय मिळविणे सोपे ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीची चर्चा आता थांबली आहे.

बालेकिल्ल्यांमधील लढत

0
0
झोपटपट्ट्यांमधील सुरक्षा, मार्केट यार्डचा विकास, बिबवेवाडीतील अनियमित बांधकामे, पूरग्रस्तांचे प्रश्न, वाहतुकीची समस्या आदी प्रश्न पर्वतीत आहेत. विकास करण्याची हमी सगळ्याच उमेदवारांनी दिली असली तरी आपआपले ‘पॉकेट’, समाज, मित्र परिवार, हितसंबंध आणि संपर्क या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.

‘बीडीपी’च ठरणार निर्णायक

0
0
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा गिअर बदलला असून, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची उमेदवारांची कसरत सुरू आहे.

जातीची समीकरणे निर्णायक

0
0
पूर्व पुण्याची महापालिका, कचरा, वाहतुकीचे फसलेले नियोजन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यांसारख्या विकासाच्या मुद्द्यांवरून हडपसरमध्ये प्रचार शिगेला पोचला आहे. वरकरणी ही लढत पंचरंगी असली तरी खरे चित्र तसे नाही.

शिवनेरीचा शिलेदार बनण्याची लढाई प्रस्थापितांना अडथळ्याची

0
0
विधानसभा निवडणुकीत जुन्नर मतदारसंघात शिवनेरीचे पाठीराखे म्हणून अतुल बेनके यांना विधानसभेत पाठविण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला आहे, तर जुन्नरची वाघीण म्हणून आशाताई बुचके यांना विधानसभेत पोहोचविण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.

आणखी काय काय पाहवे लागणार

0
0
विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील राजकीय जाहिरातींमधून सध्या ‘विनोदी नट’ अनुभवायला मिळत आहेत. आपल्या मृत्यूनंतर एखाद्याला सुंदर जग पाहता यावे, म्हणून नेत्रदानाचा विचार केला होता; पण आताच्या परिस्थितीचा विचार करता यापुढे आणखी काय काय पहावे लागेल, असा प्रश्न उभा राहिलाय.

एम. कॉम.साठीच्या नियमात बदल

0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांसाठीच्या पदव्युत्तर वर्गांना क्रेडिट सिस्टिम लागू करताना, कॉमर्स विद्याशाखेविषयी राहिलेली एक चूक विद्यापीठाने नुकतीच दुरुस्त केली.

प्रचार धडाक्याचा आज ‘सुपरसंडे’!

0
0
युती-आघाडीच्या ‘महाघटस्फोटा’नंतर स्वबळ आजमावित निवडणुकीच्या प्रचारआखाड्यात रविवारच्या सुटीची संधी साधून आज, उमेदवार मतदारसंघ पिंजून काढणार आहेत.

बेटिंगचे अॅप २० बुकींना विकले

0
0
बेटिंगचे अॅप बनविणाऱ्या एकांक्ष जैन या आरोपीने २० बुकींना हे अॅप विकल्याचे समोर आले आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या तीन बुकींनी या अॅपच्या माध्यमातून एक कोटी २४ लाख रुपयांचा नफा कमविल्याचे तपासात समोर आले.

माजी गृहमंत्री टिंगलखोरी कशी करू शकतो?

0
0
बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असताना गृहमंत्रिपदी काम केलेला नेता बलात्कारासंदर्भात अशी टिंगल कशी करू शकतो, असा परखड सवाल पुण्यातील मान्यवरांनी ‘मटा’कडे ठणकावून उपस्थित केला.

काँग्रेसच्या प्रचारसभा… सारे कसे शांत शांत!

0
0
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच पक्षांकडून शहरातील प्रचारात राज्यातील नेत्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंतची फौज उतरविण्यात आली असताना, काँग्रेसमध्ये मात्र ‘शांतता... स्टार प्रचारकांचा शोध सुरू आहे,’ असे वातावरण आहे.

व्होटर स्लिपचे आज मतदान केंद्रांत वाटप

0
0
मतदारांना घरोघरी व्होटर स्लिप वाटप करण्याचे काम शहरी भागांत जिकीरीचे झाले असून, आतापर्यंत फक्त ३५ टक्के म्हणजे केवळ २४ लाख ५० हजार व्होटर स्लिपचे वाटप होऊ शकले आहे. येत्या तीन दिवसांत सुमारे ४५ लाख ५० हजार स्लिपांचे वाटप करण्याचे आव्हान निवडणूक यंत्रणेसमोर आहे.

घोटाळे आम्ही केले; मग पैसा भाजपकडे कसा?

0
0
‘यूपीएच्या काळात सर्वाधिक घोटाळे, भ्रष्टाचार, गैरव्यवहार झाल्याची टीका झाली; पण मग जाहिरातींसाठी कोट्यवधींचा पैसा भाजपकडे कसा आला,’ असा सवाल करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पंतप्रधानांना ‘रिमोट कंट्रोल’द्वारे नियंत्रण हवे आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी शनिवारी केली.

आत्मसन्मानसाठी कन्नडिगांनी भाजपला साथ द्यावी

0
0
आत्मसन्मान राखून आपला विकास साधण्यासाठी कन्नड समाजाने महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत मिळवून देण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी केले.

‘स्टार’ प्रचारक अजितदादांच्या आज ‘मॅरेथॉन’ सभा

0
0
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्टार प्रचारक अजित पवार यांचा रविवारी पर्वती येथे रोड शो होणार आहे. तर कोथरूडसह सांगवी, भोसरी, चऱ्होली येथे जाहीर सभा घेऊन प्रचारतोफ डागणार आहेत. कोथरूडच्या सभेत ते भाजप की सेनेला लक्ष करणार याकडे कोथरूडवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘राज’पुत्राच्या रोड-शोला जोरदार प्रतिसाद

0
0
पहिल्यांदाच पुण्यात प्रचारासाठी आलेला ‘राज’पुत्र, अर्थात अमित राज ठाकरे यांच्या ‘रोड शो’ शनिवारी शहरात जोरदार प्रतिसाद मिळाला. सकाळी हडपसर तर सायंकाळी कसबा विधानसभा मतदारसंघात त्यांनी ‘रोड शो’ केला.

१५ ऑक्टोबरला मतदानासाठी सुटी

0
0
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या येत्या १५ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा आणि कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका उत्पन्न होऊ शकणाऱ्या आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन तास सवलत देण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

‘लक्ष्मीदर्शना’ला पोलिसांचा चाप

0
0
निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपाच्या प्रचाराचा धुरळा उडाल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ घडविण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी झोपडपट्टी आणि संवेदनशील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

भाजपचे दिग्गज आज पुण्यात

0
0
विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची पलटणच पुणे शहरात उतरविण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images