Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भाजपचा एकच मंत्र ‘विकासवाद’

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टिका करीत, शिवसेनेबद्दल शब्दही न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकासवाद’ हाच भारतीय जनता पक्षाचा मंत्र असल्याचा गुरुवारी (नऊ ऑक्टोबर) पुनरुच्चार केला.

राजकीय पक्षांचे ‘इमेज मेकओव्हर’

$
0
0
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना राजकीय पक्षांचे ब्रँडिंगही जाहिरातींच्या माध्यमातून जोरात सुरू आहे. मतदारांमधील तरुण मतदारांचा मोठा टक्का डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष सोशल मीडिया आणि टीव्हीवरील जाहिरांतीतून आपल्या ‘इमेज मेकओव्हर’चा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

‘त्यांची’ दिवाळी यंदाही कोरडीच

$
0
0
गेल्या दोन वर्षांपासून पगारच न मिळालेल्या राज्यातील अपंग समावेशित शिक्षण योजनेतील शिक्षकांची यंदाची दिवाळीही कोरडीच जाणार आहे. त्यामुळेच आता हे शिक्षक ‘आमच्यापैकी कोणी आत्महत्या केल्यानंतरच तुम्ही पगार करणार का’ असा हताश सवाल राज्याच्या शिक्षण खात्याला विचारू पाहत आहेत.

... दादा, तुमच्याही शंभर पिढ्या लक्षात ठेवतील

$
0
0
‘तुमच्या घराची चाकरी केली नाही तर त्यांनी जगायचं नाही का दादा, सामान्य माणूसच असा डाव टाकेल की तुमच्या शंभर पिढ्या लक्षात ठेवतील. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रमेश थोरात यांच्या चौफुला येथील सभेत राहुल कुल यांना एक डाव असा टाकला जाईल कि दहा पिढ्या लक्षात ठेवतील..’

भाजपच्या एरंडे यांच्या फॉर्च्युनरमध्ये २० लाख

$
0
0
पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर (एमएच १४ इपी ९३९३) गाडीमधून सुमारे २०.५ लाखांची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या आंबेगाव तालुका मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिंग एरंडे यांच्या मुलाला राजगुरुनगरजवळील चांडोली टोलनाक्यावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ड्रायव्हरसह ताब्यात घेतले.

अचूक अंदाज वर्तवा, २१ लाख मिळवा!

$
0
0
विधानसभा निवडणुकीचा अचूक अंदाज वर्तवण्याचे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना दिले आहे. ज्योतिष हे शास्त्र असल्याचा दावा करणाऱ्या ज्योतिषांचा पर्दाफाश करण्यासाठी अचूक भविष्य सांगणाऱ्याला २१ लाखांचे पारितोषिक देण्याची घोषणाही अंनिसने केली आहे.

महाराष्ट्र सांभाळण्यास आम्ही समर्थ

$
0
0
‘सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार चालू असताना पंतप्रधान दिल्लीत असायला हवे होते. परंतु, हे प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांनी देश सांभाळावा. महाराष्ट्र सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहोत,’ असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सर्वेसर्वा राज ठाकरे यांची आज होणारी सभा यशस्वी होण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. सभास्थळी स्टेज आणि स्क्रीनची उभारणी जवळपास पूर्ण होत आली आहे.

सत्तेत आल्यास प्रांतवाद करणार नाही

$
0
0
‘सीमेवर गोळीबार होत असताना देशाच्या संरक्षणाऐवजी आपले पंतप्रधान मात्र महाराष्ट्रात प्रचारासाठी येतात, ही राष्ट्राची शोकांतिका आहे. राष्ट्रवादीला साथ द्या, महाराष्ट्रात गतिमान सरकार देवू. विकासाबाबत कोणताही प्रांतवाद करणार नाही,’ असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

राज्यात भाजपला नेतृत्वच नाही

$
0
0
पाकिस्तानकडून सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला जात असताना देशाचे पंतप्रधान मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पक्षीय व्यासपीठावर प्रचारात गुंतले आहेत.

मोदींचे गरज सरो वैद्य मरो

$
0
0
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानासाठी माझ्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रोखून मला उशीर करण्यात आला,’ असा आरोप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चाकण येथील जाहीर सभेत केला.

पुण्यासह महाराष्ट्रही जागेवरच!

$
0
0
‘विरोधकांनी विकासासाठी मते जरुर मागावीत. पण ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी खोटी जाहिरातबाजी करून राज्याची बदनामी कशाला करावी? अरे, पुण्यासह पिंपरी चिंचवड, महाराष्ट्रदेखील जागेवरच आहे,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातबाजीला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टोला हाणला.

काका-पुतण्याची संद्दी संपवा

$
0
0
‘देश स्वतंत्र झाला असला, तरी बारामतीतील शेतकरी अजूनही काका-पुतण्यांच्या गुलामगिरीतच आहे. त्यांचे शेत,जमिनी सुरक्षित नाहीत. नोकरी हवी असेल, शेताला पाणी हवे असेल, ऊस विकायचा असेल, तरी शेतकऱ्यांना या दोघांपुढे झुकावे लागते,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागतानाच ‘काका-पुतण्यांच्या गुलामगिरीतून महाराष्ट्राची सुटका करण्याचा,’ नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बारामती येथे दिला.

कोथळा बाहेर काढू!: सेनेचा इशारा

$
0
0
‘डोंगरातला उंदीर शोधायला आलेल्या अफझलखानाचे काय झाले ते उभ्या हिंदुस्थानला माहीत आहे. माझे शिवसैनिक उंदीर नाहीत तर वाघनखं आहेत. विधानसभा निवडणुकीत तुमचा राजकीय कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना दिला आहे.

भाजप-राष्ट्रवादीचे आधीच मनोमिलन

$
0
0
‘युती आणि आघाडी अलीकडे तुटली असली, तरी लोकसभा निवडणुकीनंतरच भाजप आणि राष्ट्रवादीचे मनोमिलन झाले होते. अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी युती आणि आघाडी मोडून या नेत्यांनी केवळ जनतेला मूर्ख बनवले,’ अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

सेनेच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीकडून गोंधळ?

$
0
0
काळूस येथे शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या भरप्रचार सभेत राष्ट्रवादीच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत उमेदवार गोरे यांना धक्काबुक्की करण्याचा गंभीर प्रकार घडला.

‘एलईडी’वरील जाहिरात ठरतेय आकर्षण केंद्र

$
0
0
शहरामध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांकडून वापरल्या जाणाऱ्या एलईडी स्क्रिन नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा एक चांगला प्रयत्न म्हणून वाखाणला जात आहे.

दिल्लीच्या तालावर नाचणारे सरकार नको!

$
0
0
महाराष्ट्रातून विदर्भाला वेगळे करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा डाव आहे. कुणी कितीही जन्म घेतले तरी महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच महाराष्ट्रात दिल्लीच्या तालावर नाचणारे सरकार निवडून देऊ नका, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले.

अखेर अवतरले ‘स्टार प्रचारक’!

$
0
0
टीव्हीमधील जाहिरातींवरूनच दर्शन होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची अखेर पुण्यातील निवडणुकीच्या रणधुमाळीत एन्ट्री झाली!

पाकिस्तानच्या गोळीबाराकडे केंद्राची डोळेझाक

$
0
0
‘भारत-पाक सीमेवरील धुमश्चक्रीचे राजकारण करू नका, असा सल्ला पंतप्रधान देत असले, तरी याची सुरुवात त्यांनीच केली,’ असा पलटवार काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images