Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गडकरींवर बूट फेकणाऱ्याला जामीन

$
0
0
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बूट फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संदीप कराड याची मंगळवारी कोर्टाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेख यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

नेत्यांच्या सभांअभावी सेनेची डरकाळी गायब

$
0
0
भारतीय जनता पक्षाबरोबर असलेली पंचवीस वर्षे जुन्या युतीतून बाहेर पडत आगामी विधानसभा निवडणूक ‌स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. मतदारांनी राज्यात शिवसेनेला एक हाती सत्ता देण्याची भावनिक साद घालत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विविध भागात जाहीर सभाही घेतात.

पिस्तुलाच्या धाकाने पळवली मोटार

$
0
0
निवडणुकीच्या आखाड्यात स्मार्ट आणि सुरक्षित शहर होण्याची स्वप्ने राजकारणी मंडळी दाखवीत असतानाच प्रत्यक्षात पुणे किती असुरक्षित आहे, याचा प्रत्यय वारज्यात मंगळवारी पहाटे आला.

पुण्याला हवे हायकोर्टाचे खंडपीठ

$
0
0
पुण्याला मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मिळावे म्हणून पुण्यातील वकिलांकडून जोरदार मागणी करण्यात येत असतानाही पुण्यातील राजकीय नेते, राजकीय पक्ष फक्त ‘तुम्हीच लढा आम्ही फक्त तुमच्या मागेच आहोत’ अशा कातडीबचाव अशा भूमिकेत होते.

उमेदवारांकडून सर्रास ‘लक्ष्मीदर्शन’

$
0
0
‘युती’ आणि ‘आघाडी’ तुटल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांना विजयाची संधी दिसू लागल्याने विधानसभा निवडणुकीत पैशांचा धुरळा उडत आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांना ‘पॅक’ करण्यापासून विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी, गणपती मंडळांना ‘रसद’ आणि सोसायट्यांना ‘मदत’ करण्यापर्यंत पैशांचे सर्रास वाटप सुरू आहे.

उद्धव ठाकरेंची गुरुवारी सभा

$
0
0
शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा येत्या गुरुवारी (९ ऑक्टोबर) होणार आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिल्यानंतर पुणे शहरात ठाकरे यांची ही पहिलीच सभा असल्याने शहरातील सेनेची ताकद दाखविण्यासाठी जोरदार तयारी शिवसैनिकांनी सुरू केली आहे.

पुण्यात गारांचा पाऊस

$
0
0
सकाळपासून वाढलेल्या उकाड्यानंतर दुपारी शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जेमतेम अर्धातास झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तर स्वारगेटसह शहराच्या काही भागात गाराही पडल्या.

हवा स्वतंत्र महापालिकेचा आधार

$
0
0
शहराचा वाढता पसारा लक्षात घेता, पुणे महापालिकेवरील ताण अधिक वाढविण्यापेक्षा नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांचा समावेश नव्या पालिकेत करून पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करणे आवश्यक ठरते आहे.

आंबेगावात 'अरुणोदय' होणार का?

$
0
0
केंद्रात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील आणि राज्यात दिलीप वळसे-पाटील अशी खूणगाठच आंबेगावच्या जनतेने मनाशी बांधलेली आहे. गेल्या तीन निवडणुकांत वळसे-पाटील यांचा पाडाव करण्यासाठी आढळराव यांनी प्रतिष्ठा पणाला लावली; पण त्यांना यश आले नाही.

खच्ची काँग्रेसचा प्रचारदेखील विस्कळीतच

$
0
0
निवडणूक जाहीर झाली आणि प्रचाराने वेग घेतला, की शहरभर विखुरलेले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकत्र गोळा होतात. आपापसातील मतभेद विसरून त्या-त्या भागांतील काँग्रेसच्या नेतेमंडळींचे चेहरे एकत्र व्यासपीठ ‘शेअर’ करतात अन् काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात आपसूकच रंग भरू लागतात.

चौकशीची मागणी दादांनी करावी?

$
0
0
‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या नगरविकास खात्याच्या फायलींची चौकशी करण्याची मागणी केली जात असली, तरी फायलींच्या चौकशीची मागणी अजितदादांनी करावी, यासारखे दुसरे आश्चर्य नाही’, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना टोला लगावला.

उमेदवारांनी ब्लू प्रिंट सादर करावी

$
0
0
हक्क, पर्यावरण, सुप्रशासनाचा अधिकार, वाहतूक, दळणवळण यासंदर्भातील प्रश्न आणि नियोजनबद्ध विकास आराखडा यावर आधारित पिंपरी-चिंचवड शहराची ‘ब्लू प्रिंट’ शहरातील तिन्ही मतदारसंघातील लोकप्रिनिधींनी नागरिकांपुढे मांडावी.

पिंपरीत आज मोदी, ठाकरेंच्या सभा

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज (बुधवारी ) पिंपरीतील एच. ए. मैदानावर सभा घेणार आहेत. तर, दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे भोसरी व सांगवी येथे दोन सभा घेणार आहेत.

मनसेच्या सभेची जोरदार तयारी

$
0
0
अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेली पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची जिल्ह्यातील एकमेव सभा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जोरदार नियोजन सुरू आहे. सभेसाठीची सर्व तयारी हळूहळू पूर्ण होत असून, सभेला गर्दी जमविण्यासाठी गटप्रमुखांच्या पातळीपर्यंत नियोजन करण्यात आले आहे.

कचराप्रश्न निवडणुकीनंतर कचऱ्यात का जातो?

$
0
0
गेल्या दहा ते पंधरा वर्षांत पुणे शहराचा चेहरामोहरा अक्षरश: बदलून गेला आहे. मध्यवर्ती पेठांपासून सर्वसाधारण पाच ते सहा किलोमीटरपर्यंत असलेली शहराची हद्द तीन ते चार पटीने वाढून २० ते २५ किलोमीटरपर्यंत गेली आहे. ही परिस्थिती केवळ एकाच दिशेला नव्हे तर चारही दिशांना झालेली आहे.

डेंगीमुळे प्लेटलेटची मागणी वाढली

$
0
0
गेल्या काही दिवसांत डेंगीच्या पेशंटमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण घसरत असल्याने बाहेरून द्याव्या लागणाऱ्या प्लेटलेटची मागणी प्रचंड वाढली आहे. शहरातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा मोठा तुटवडा असल्याने पेशंटसह रक्तपेढ्याचालकांचीही पळापळ होऊ लागली आहे.

पुण्याच्या फुफ्फुसांना प्रदूषणाचा संसर्ग

$
0
0
मेट्रो प्रकल्पापासून ते पीएमटीच्या सुधारणेबाबत, वैद्यकीय, शैक्षणिक, औद्योगिक अगदी सांस्कृतिक धोरणांबद्दल अनेक आश्वासने विधानसभेच्या निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांकडून ऐकायला मिळत आहेत.

सिंहगड रोडवर बँक मॅनेजरचे अपहरण

$
0
0
सनसिटी रोडवरून बँक मॅनेजरचे अपहरण करून त्याच्या पत्नीला धमकवून खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मॅनेजरने घाबरल्यामुळे दोन दिवसांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जन्मजात दोषामुळे गेलेली दृष्टी पुन्हा मिळाली

$
0
0
डोळ्याच्या आतील नसेला जन्मजात पडलेल्या छिद्राबरोबरच पडदा सरकल्याने गेलेली दृष्टी अत्याधुनिक सर्जरीमुळे (एमआयव्हीएस) पुन्हा मिळाली आणि सुतारकामात होणाऱ्या चुका टाळणे पेशंटला शक्य झाले.

मोदींनी विदर्भाबाबतची भूमिका स्पष्ट करावी!

$
0
0
महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याबरोबरच बेळगाव सीमाप्रश्नाबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणती भूमिका असेल हे स्पष्ट करावे, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीनलम गोऱ्हे यांनी केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images