Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जगातील सर्वात मोठ्या टेलिस्कोपची निर्मिती आजपासून

$
0
0
जगातील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक टेलिस्कोपच्या निर्मितीला मंगळवारी प्रारंभ होत आहे. हवाई बेटांवरील माउना किया येथे उभारल्या जाणाऱ्या या टेलिस्कोपच्या आरशाचा व्यास ३० मीटर असल्याने त्याचे नामकरण ‘थर्टी मीटर टेलिस्कोप’ (टीएमटी) असे करण्यात आले आहे.

सत्तेत आल्यावर शिवस्मारक उभारू

$
0
0
‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा सहा वर्षांपूर्वी केली; पण स्मारक काही उभे राहिले नाही. आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या बजेटमध्ये तरतूद करून शिवस्मारक उभारू,’ अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केली.

काँग्रेसला हवा स्टार प्रचारक

$
0
0
सर्वाधिक तरुण मतदार शहरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही याच भागातील आणि विधानसभेत नव्या दमाचे उमेदवार रिंगणात असूनही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुण्याऐवजी पुणे जिल्ह्याच्या वेशीवर सभा घेण्यासाठी येणार आहेत.

काँग्रेसकडे व्हीजन घराणेशाहीचे

$
0
0
‘परिवारवाद आणि घराणेशाही यामध्ये अडकून पडल्याने काँग्रेसकडे व्हीजनच नाही. त्यामुळे, गरिबी हटाओची घोषणा पहिल्या पंतप्रधानांपासून त्यांच्या पणतूपर्यंत सर्वांना द्यावी लागते’, अशा शब्दांत केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी काँग्रेसवर हल्ला चढविला.

राज ठाकरेंची सभा नदीपात्रातच!

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा एस. पी. कॉलेजच्या मैदानाऐवजी आता नदीपात्रात होणार आहे. मध्यवर्ती ठिकाण, पार्किंगची सोय म्हणून नदीपात्रात सभा घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

गडकरींना बूट मारण्याचा प्रयत्न

$
0
0
केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना बूट मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने सोमवारी रात्री पुण्यात केला. कोथरूडमधील प्रचारसभेत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’चे तीन तेरा

$
0
0
ऊस आणि दूधदराचा प्रश्न आक्रमकपणे माडून शेतकऱ्यांची आक्रमक चळवळ निर्माण करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा निवडणुकीत तीन तेरा वाजले आहेत.

खंडपीठासाठी सकारात्मक पाऊल टाकणार

$
0
0
‘मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्यात स्थापन व्हावे, अशी पुण्यातील वकील आणि नागरिकांची पूर्वीपासून मागणी आहे. या संदर्भात चर्चा करून सकारात्मक पावले उचलण्याची आमची भूमिका आहे,’ असे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप पोहचवणार मनसेची ब्ल्यू प्रिंट

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तयार करण्यात आलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा (ब्ल्यू प्रिंट) आता मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ‘राजमार्ग विकासाचा’ हे अॅप्लिकेशन मंगळवारी सादर करण्यात आले.

कुठे नेऊन ठेवले राष्ट्रवादीचे ‘स्टार प्रचारक’?

$
0
0
निवडणुकीला अवघा आठवडाभर राहिला असताना आठही मतदारसंघातील प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना वेळ मिळत नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

व्होटर स्लिप शंभर टक्के वाटप हवे

$
0
0
मतदारांना घरोघरी जाऊन शंभर टक्के व्होटर स्लिप वाटप करण्याची सूचना विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी केली. आतापर्यंत वीस ते पंचवीस टक्केच स्लिपा वाटप झाल्याने त्याची गती वाढविण्यासही त्यांनी सांगितले.

स्वतंत्र विदर्भ आजही अजेंडा

$
0
0
महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले असले, तरी स्वतंत्र विदर्भाचा विषय भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर कायम असल्याचा पवित्रा पक्षाने मंगळवारी घेतला.

पायाभूत प्रकल्पाचा पाया ठोस हवा

$
0
0
गेल्या काही काळात बाकी सर्व शहरे पुढे जाऊ लागलेली असताना पुण्यात फक्त चर्चा-वाद होतात, विकासाच्या बाबतीत ठोस काहीच होत नाही, अशी खंत सर्वांच्याच मनात आहे. त्यामध्ये काही वस्तुस्थितीही आहे आणि त्याचे परिणाम पुणेकरांना भोगावेही लागत आहेत.

आंबेगावात ‘अरुणोदय’ होणार का?

$
0
0
केंद्रात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील आणि राज्यात दिलीप वळसे-पाटील अशी खूणगाठच आंबेगावच्या जनतेने मनाशी बांधलेली आहे. गेल्या तीन निवडणुकांत वळसे-पाटील यांचा पाडाव करण्यासाठी आढळराव यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. पण त्यांना यश आले नाही.

‘आरपीआय’-भाजप धुसफूस

$
0
0
मतदार संघांच्या निकालाचे चित्र बदलून टाकण्याएवढे उपद्रवमूल्य असलेला पक्ष म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले गट. या गटाने भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर ‘आरपीआया’चे उपद्रवमूल्य किती आहे, याची जाणीव विरोधी पक्षांना होऊ लागली आहे.

यंदाची ‘पेट’ही डिसेंबरमध्येच शक्य

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) घेण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे.

निवडणुकीच्या मतपत्रिका रवाना

$
0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १ हजार ७० मतदारांना मतपत्रिका रवाना करण्यात आल्या. या मतपत्रिका २० ऑक्टोबरपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.

भाजपच्या जाहिरातींविरोधात काँग्रेसची तक्रार

$
0
0
भारतीय जनता पक्षातर्फे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखविल्या जात असल्याने त्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे.

गुरुवारचा दिवस दिग्गजांच्या सभेचा

$
0
0
उद्योगनगरीत प्रचाराचा जोर वाढत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरीतील एचए ग्राउंडवर सभा होणार आहे. याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भोसरी आणि सांगवी येथे सभा होणार आहे.

आचारसंहिता भंगाच्या ११७ तक्रारी

$
0
0
वाहनांचा गैरवापर, विनापरवाना बैठका, राजकीय पक्षाच्या नेत्यावर हल्ला आणि बेहिशोबी रोकड बाळगल्या प्रकरणी आचारसंहिता भंगाच्या ११७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील १७ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images