मतदारांना आयत्या वेळी जाणवणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्याबरोबरच मतदारयादीतील नाव व मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली हेल्पलाइन अजूनही मतदारांपासून ‘नॉट रीचेबल’ आहे.
मतदार हेल्पलाइन ‘नॉट रीचेबल’
↧
↧
बुडत्या काँग्रेसचा पाय खोलात
पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसची अवस्था दयनीय होत असतानाच आझमभाई पानसरे यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शहरात बुडत्या काँग्रेसचा पाय अधिकच खोलात गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, त्याचा फटका पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
↧
पुण्यात मोदींची सभा नाही?
निवडणुकीच्या विजयातला हुकमी एक्का मानले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांच्या कार्यक्रमात पुण्याचा समावेश करण्यात आलेला नाही. आधीच शिवसेनेची संगत सुटल्याने गॅसवर असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोदींची सभाही होणार नसल्याच्या चर्चेने आणखी अस्वस्थ झाले आहेत.
↧
अमित शहा यांची आज राजगुरूनगरला सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा राज्यातील प्रचार दौरा सुरू झाला असून खेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शरद बुट्टे-पाटील यांच्या प्रचारार्थ शहा यांची सभा आज, सोमवारी राजगुरूनगरमध्ये होत आहे.
↧
भाजपकडे नेतृत्वाचा चेहरा नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विसंबून असलेल्या भाजपाकडे नेतृत्वाचा चेहराच नाही, तरीही ते सत्तेत येण्याची स्वप्ने पाहात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
↧
↧
स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने बारामती तालुक्यातील सोनगाव येथील एकाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या संसर्गाने दहा जणांचा बळी गेला. ४८ वर्षाच्या या पेशंटला २६ सप्टेंबरपूर्वीच संसर्गाची लक्षणे दिसून आली होती.
↧
‘राखीव’ विद्यार्थ्यांचा विचार खुल्या जागांसाठी नाही
राखीव गटांमधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देऊनही खुल्या गटातील जागांपर्यंत मजल मारणाऱ्या उमेदवारांविषयी नव्याने जाहीर झालेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
↧
काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक आज भाजपमध्ये
निवडणुकीच्या तोंडावर हडपसर व परिसरातील काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक आणि अन्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.
↧
खराडीत सॉफ्टवेअरद्वारे बेटिंग
ऑनलाईन बेटिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर तयार करून खराडीत बेटिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल अशा विविध खेळांवर बेटिंग घेण्यात येत होते.
↧
↧
प्रचारासाठी अभिनेत्रींना मागणी
प्रचारफेरी, पदयात्रेला ग्लॅमर आणण्यासाठी उमेदवारांकडून सेलिब्रेटींसाठी मागणी येऊ लागली आहे. अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना जास्त प्राधान्य देण्यात येत आहे.
↧
मायावतींचा महाराष्ट्रात झंझावात
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांचा राज्यातील दौरा सात ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, पुण्यात नऊ तारखेला दुपारी एक वाजता श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
↧
शाळांत लेदरऐवजी कॅनव्हासचे बूट?
राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना लेदरऐवजी कॅनव्हासचे बूट वापरण्याची शिफारस राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे केली जाणार आहे. पर्यावरणपूरक नसल्याने लेदरचे बूट वापरणे हानीकारक ठरू शकते.
↧
मोदी दौऱ्याने अडकले ‘युवराज’
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर पुण्यातील दौरा रद्द करण्याची वेळ दुसऱ्यांदा आली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेमुळे विमानाच्या टेकऑफला परवानगी नाकारण्यात आल्याने ठाकरे नाशिकहून पुण्यात मेळाव्याला येऊ शकले नाहीत.
↧
↧
आठवलेंनी उडवली राजची खिल्ली
युतीच्या मुद्द्यावरून रामदास आठवले यांच्यावर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आठवले यांनी आज त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. ‘महाराष्ट्राची सत्ता दिल्यास सोनं करेन असं म्हणणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकचा कोळसा केला आहे,’ असा घणाघात आठवले यांनी केला.
↧
हवाला ऑपरेटर्सने घेतली कारवाईची धास्ती
राज्यात पंचरंगी निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून पैशांचा पाऊस पडत असल्याच्या चर्चाही झडत आहेत. मात्र, या रणुधमाळीत पुणे शहरात करोडो रुपयांचा व्यवहार करणाऱ्या हवाला ऑपरेटर्सने आपले व्यवहार बंद केले आहेत.
↧
घडली तुळशीबागेची माहितीपूर्ण सफर
‘पुण्यात आलेली कोणतीही स्त्री तुळशीबागेत न जाता राहूच शकत नाही,’ हे वर्णन किती सार्थ आहे, याचा प्रत्यय फक्त स्त्रियांनीच नाही, तर आबालवृद्धांनीही नुकत्याच झालेल्या हेरिटेज वॉकदरम्यान दिला. तुळशीबाग ही ‘ऐतिहासिक शॉपिंग कॉम्प्लेक्स’ कशी काय, हेदेखील या वॉकदरम्यान उपस्थितांच्या लक्षात येत गेले.
↧
‘त्यांच्या’ स्वप्नांना मिळाली सायकलची गती...
स्वतःची एक सायकल असावी, हे मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्यावर चिमुरड्यांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. ‘ज्या पुणेकरांनी आम्हाला या सायकल दिल्या, त्यांना आमचे खूप खूप धन्यवाद,’ अशी प्रतिक्रिया चिमुकल्यांनी व्यक्त केली.
↧
↧
‘कॅट’च्या नोंदणीसाठी आणखी एक दिवस
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील (आयआयएम) प्रवेशांसाठी आवश्यक ‘कॉमन अॅडमिशन टेस्ट’ अर्थात ‘कॅट’ या परीक्षेकरिता नोंदणी करण्याची उमेदवारांना आणखी एक संधी आहे. येत्या शुक्रवारी त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
↧
मतपत्रिकांसाठी मतदारांनाच रहावे लागणार सतर्क
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या मतपत्रिका पाठवण्यासाठी रजिस्टर एडीची पद्धत न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळातर्फे ७ ऑक्टोबरला मतपत्रिका पाठवल्या जाणार असून, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतपत्रिका मिळण्याबाबत मतदारांनाच सतर्क रहावे लागणार आहे.
↧
उच्चशिक्षित तरुणांमुळेच देशाची प्रगती
उच्चशिक्षणावर खऱ्या अर्थाने तरुणांची पर्यायाने देशाची प्रगती अवलंबून आहे. मात्र आपल्याकडे तरुणांच्या संख्येच्या तुलनेत केवळ २० टक्केच विद्यापीठे आणि कॉलेज उपलब्ध आहेत. देशातील १७ ते २३ वयोगटातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण द्यायचे असेल, तर अजून ८०० विद्यापीठे आणि ३२ हजार कॉलेजची गरज आहे.
↧
More Pages to Explore .....