Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘साहेबां’नी दिला ‘दादां’ना सबुरीचा सल्ला!

$
0
0
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्ले चढविणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सबुरीचे बोल सुनावले आहेत. ‘निवडणुकीच्या काळात व्यक्तिगत टीका-टिप्पणी सर्वांनीच टाळावी, असा माझा सर्व सहकाऱ्यांना सल्ला आहे,’ असे त्यांनी शुक्रवारी नमूद केले.

दादांचा दम की निव्वळ भ्रम?

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी पक्षातील नगरसेवकांना दम दिला. मात्र, हा दम की भ्रम या संभ्रमावस्थेत अनेकजण आहेत. तर, काहींनी धास्ती घेऊन नावाला का होईना प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी दरीत कोसळून एक ठार

$
0
0
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून साताऱ्याहून मुंबईला जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) निमआराम बस (एमएच-०७ सी९०३८) खंडाळ्यानजीक दरीत कोसळून शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात चालकासह एकाचा मृत्यू झाला; तर १४ जण जखमी झाले आहेत.

दलित पँथरचा आता NCP ला पाठिंबा

$
0
0
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या दलित पँथरने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींना राजकारणातून दूर ठेवण्यासाठी ही भूमिका घेण्यात आल्याचे दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘राज’पुत्र उतरणार प्रचारात

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलूखमैदानी तोफ दहा ऑक्टोबर रोजी पुण्यात धडाडणार आहे. पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची जाहीर सभा दहा ऑक्टोबर रोजी एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणार आहे.

कोण म्हणते सेना एकाकी?

$
0
0
बाळासाहेब असते, तर शिवसेना सध्यासारखी एकाकी पडली असती का?... राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा प्रश्न केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल त्यांचा सवाल होता, ‘कोण म्हणत सेना एकाकी आहे!’ आपल्या या उत्स्फूर्त उत्तराचा पवार यांनाच काहीसा अचंबा वाटला असावा.

भाऊबंदकी आमने-सामने

$
0
0
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले आहेत. राज्यातील युती व आघाडीत बिघाडी झाल्याने काही ठिकाणी भाऊबंदकी एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे. भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहिणी- बहिणी, चुलते-पुतणे, दीर-भावजय यांच्यात रंगतदार लढती होत आहेत.

'पाटीलकी'ला आव्हान

$
0
0
गेली पंधरा वर्षे मंत्रिपदाच्या खुर्चीत असूनही रखडलेला विकास, दुष्काळी गावांच्या पाण्याचा प्रश्न, धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनात झालेला शाईफेकीचा प्रकार यामुळे इंदापूरमधील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या मतदारसंघातील ‘पाटीलकी’ला प्रथमच मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

‘प्रभात’च्या पडद्याला स्मृतींचा दरवळ

$
0
0
मराठी सिनेमांवर प्रेक्षकांच्या उड्या, ‘हाउसफुल’चे बोर्ड आणि तो काळ गाजवणारे कलावंत... ज्या ठिकाणी ही किमया साधली ते प्रभात थिएटर... ‘प्रभात’नेच आम्हाला रसिकमान्यता दिली आणि ओळखही.....अशा शब्दांत शनिवारी मराठीतल्या प्रथितयश कलावंतांनी प्रभात थिएटरशी असणारे नाते उलगडले.

टॅक्सी व्यवसायातून ४ कोटींची उलाढाल

$
0
0
पीएमपी बस आणि रिक्षा हे सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पुणे शहरात टॅक्सी व्यवसायही दिवसेंदिवस विस्तारत आहे. शहर आणि परिसरात सध्या दररोज २४ हजार गाड्यांच्या एक लाख फेऱ्या होत असून त्याद्वारे दररोज चार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.

मंगलयान सीमोल्लंघनाचा विजयोत्सव

$
0
0
भारतीय वैज्ञानिकांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी मंगलयान मोहीम यशस्वी केल्याबद्दल विजयोत्सव शनिवारी पुण्यात साजरा करण्यात आला. समर्पण प्रतिष्ठान, विज्ञान भारती आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे ‘विज्ञानाचा जल्लोष आणि मंगळयानाचे सीमोल्लंघन विजयोत्सव यात्रा’ ही यात्रा आयोजित केली होती.

एसटी अपघातातील जखमींची ओळख पटली

$
0
0
लोणावळा- खंडाळा येथे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील कुणे पुलावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची निमआराम एसटी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला होता.

अवैध बांधकामे, मेट्रो मुख्यमंत्र्यांमुळेच प्रलंबित

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच अवैध बांधकामे, मेट्रो-वाहतुकीसारखे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. निर्णय घेण्यात त्यांनी केलेल्या दिरंगाईचा फटका पुणे, पिंपरी-चिंचवडला बसला आहे, अशी थेट टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली.

भावाच्या खुनाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

$
0
0
जमीन वाटपाच्या वादातून गवत कापण्याच्या विळ्याने वार करून भावाचा खून केल्याप्रकरणी भावाला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एन. दिक्कतवार यांनी हा निकाल दिला.

झाडू मारण्याएवढे पंतप्रधान स्वस्त आहेत का?

$
0
0
‘देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जावे, काय करावे, कसे करावे, याचे काही संकेत आहेत. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी त्याचे पालन केले. भाजपच्या पंतप्रधानांनी रस्त्यावर झाडू मारून हे संकेत धुडकावले असून, देशाचा पंतप्रधान इतका स्वस्त कधीच झाला नव्हता’

हिंदुत्वाच्या छुप्या अजेंड्याचा अखेर पर्दाफाश

$
0
0
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांचे भाषण सरकारी दूरदर्शन वाहिनीवरून देशभर प्रक्षेपित करून मोदी सरकारचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा अखेर जनतेसमोर आला आहे. विकासाचा मुखवटा धारण करताना मोदींना खरा चेहरा काय आहे, याचा या निमित्ताने पर्दाफाश झाला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी केली.

निष्पक्ष व्यासपीठावर ठरणार पुणेकरांचा अजेंडा

$
0
0
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमधून विधानसभा निवडणूक प्रचाराचा फोकस पुण्याच्या विकासासंदर्भातील कळीच्या मुद्द्यांकडे वळविण्यासाठी आज, रविवारी शनिवारवाड्यावर ‘मटा डिबेट’चे आयोजन करण्यात आले आहे.

नाराज कार्यकर्ते काँग्रेसपासून दूरच

$
0
0
लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांऐवजी बाहेरच्या लोकांवर विश्वास टाकल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेतही पक्षापासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे.

पिस्तुल कारखाना उद्‍‍ध्वस्त

$
0
0
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पिस्तुल तयार करणारा कारखाना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी उद्‍‍ध्वस्त केला. त्या वेळी अटक करण्यात आलेल्या आरोपीने पुणे आणि परिसरात ९० पिस्तुले विकल्याचे स्पष्ट झाले आहे.

म्हणे, 'अतिथी देव नव्हे!'

$
0
0
पुणेकरांना सोडाच, परदेशी पर्यटकांनाही लुटण्यात रिक्षाचालकांनी आता आघाडी घेतली आहे. रिक्षाचालकांच्या या प्रतापाचा फटका थेट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळालाही बसला आहे. उपद्रवी रिक्षाचालकांचे नेमके करायचे काय, या विचित्र कात्रीत महामंडळ अडकले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images