Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हर्षवर्धनभाऊंच्या ‘पाटीलकी’ला आव्हान

$
0
0
गेली पंधरा वर्षे मंत्रिपदाच्या खुर्चीत असूनही रखडलेला विकास, दुष्काळी गावांच्या पाण्याचा प्रश्न, धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनात झालेला शाईफेकीचा प्रकार यामुळे इंदापूरमधील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या मतदारसंघातील ‘पाटीलकी’ला प्रथमच मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

विमाननगर परिसरात सिलिंडर स्फोटात आठ जखमी

$
0
0
नगर रस्त्यावरील हयात हॉटेलमागे असलेल्या एका स्नॅक्स सेंटरच्या सिलिंडर गॅसचा गळतीमुळे झालेल्या स्फोटात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खडकी वीजधक्का प्रकरणी तिघांवर गुन्हा

$
0
0
विजेची तार तुटून पाण्यात पडल्याने प्रवाहामुळे दोघांचा बळी गेल्याच्या खडकीतील घटनेला ‘महावितरण’चे अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला असून, ‘महावितरण’च्या सहकार्यकारी अभियंत्यासह तिघांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपी बँकेच्या ठेवीदारांचा आज मेळावा

$
0
0
बेफाम कर्जवाटप करणारे संचालक आणि चुकीचे आर्थिक अहवाल देणारे लेखापरीक्षक आणि सहकार खात्याच्या मुजोरपणाच्या विरोधात निर्णायक लढा पुकारण्याचा निर्धार रुपी संघर्ष समितीने केला असून, त्यासाठी आज, शनिवारी ठेवीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

‘भाईचंद’ पतसंस्था करणार ठेवीदार समितीशी चर्चा

$
0
0
कोट्यवधी रुपयांच्या गैरकारभारामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या भाईचंद हिराचंद मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदार समितीशी चर्चा करण्याची तयारी पतसंस्थेच्या संचालक-अधिकाऱ्यांनी दाखविली आहे.

बर्वे चौकातला ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला

$
0
0
वादग्रस्त ठरलेल्या स. गो. बर्वे चौकातील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले असून, शिवाजी पुतळा चौकाकडून सिमला ऑफिस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी ग्रेड सेपरेटचा वापर दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केला आहे.

आयएमए-जीपीएमध्ये पुन्हा संघर्ष

$
0
0
राज्य सरकारने होमिओपॅथ, आयुर्वेद शाखेच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याचे अध्यादेश जारी केल्याने संतापलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) त्यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली.

पुणेकरांनी साधला दसऱ्याचा ‘मुहूर्त’

$
0
0
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी पुणेकरांनी जोरदार खरेदी करत दसऱ्याचा ‘मुहूर्त’ साधला. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर घटल्याने सोन्या चांदीच्या दागिन्यांनाही पुणेकरांची पसंती मिळाली.

महिला मतदारांची संख्या वाढली

$
0
0
निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. मात्र, राज्यभरातील परिस्थिती पाहता अजूनही पुणे जिल्हा यामध्ये मागेच आहे.

प्रचार सभांचा धडाका आजपासून

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे १० दिवस राहिले असल्याने शनिवारपासून (४ ऑक्टोबर) सर्वच पक्षांतर्फे प्रचार सभांच्या धडाक्याला सुरुवात होत आहे.

काँग्रेसवर नामुष्की!

$
0
0
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभा निवडणूक प्रचारासाठी टीव्ही चॅनेल्सवर दाखविली जाणारी जाहिरात मतदारांची फसवणूक करत असल्याची तक्रार औरंगाबाद येथील ‘जिज्ञासा प्रतिष्ठान’ने केली होती.

वडगाव शेरीत भाजपचा प्रचार करणार नाही

$
0
0
विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची (आठवले) गटाची भाजपबरोबर युती असल्याने शहरातील सात मतदारसंघांत पक्षाचे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करतील.

निवडणुकीवर ‌बहिष्काराचा ग्रामस्थांचा इशारा

$
0
0
चाकणमधील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, बिरदवडी येथील ग्रामस्थांनी चाकण ग्रामपंचायतीच्या कचऱ्याच्या गाड्या रोखून कचरा टाकण्यास कर्मचाऱ्यांना मज्जाव केला.

टिंबर मार्केट आरक्षण रद्द करण्यास विरोध

$
0
0
बिबवेवाडी परिसरातील तब्बल ५७ एकर जागेवरील टिंबर मार्केटचे आरक्षण रद्द करून हा भाग निवासी करण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेसह सत्ताधारी काँग्रेसनेही विरोध केला आहे. त्यामुळे, सत्ताधारी राष्ट्रवादीवर हा प्रस्ताव पुढे ढकलण्याची वेळ मंगळवारी आली.

शहरात अठराशेहून अधिक अनधिकृत मोबाइल टॉवर

$
0
0
शहरात सुमारे अठराशेहून अधिक अनधिकृत मोबाइल टॉवर असले, तरी पालिकेची रीतसर परवानगी घेऊन, त्यासाठीचा आवश्यक कर भरून हे टॉवर अधिकृत करता येऊ शकणार आहेत.

कँटोन्मेंटचे मतदार घटले

$
0
0
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे कँटोन्मेंट बोर्डाने मतदार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सुमारे आठ हजार मतदार कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. बोर्डाच्या हद्दीतील नागरिक हे पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघासाठी मतदान करतात.

उमेदवारांची फिल्डिंग ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये

$
0
0
लोकशाही, मतदान प्रक्रिया आणि एकूणच प्रशासकीय यंत्रणेबद्दल भरभरून बोलण्यास इच्छुक असलेले उत्साही ज्येष्ठ नागरिक सध्या उमेदवारांच्या टार्गेटवर आहेत.

‘मोदींनी केले अमेरिका दौऱ्याचे मार्केटिंग’

$
0
0
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकन सरकारशी किती सुसंवाद साधला, ते ठाऊक नाही. पण आपल्या दौऱ्याचे मार्केटिंग मात्र त्यांनी भरपूर केले,’ अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी टीकास्त्र सोडले.

मोदींच्या सभेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच

$
0
0
‘लाट असताना सभा कशाला’, अशी टीका जुन्या मित्रपक्षाकडून केली जात असताना ग्रामीण भागातील मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

उमेदवारांनी अव्हेरला विकासाचा अजेंडा

$
0
0
मेट्रो शहराकडे आगेकूच करण्याऐवजी बजबजपुरीच्या दिशेने पुण्याची अधोगती होत असताना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मात्र विकासाच्या मुद्याला सर्वपक्षीय उमेदवारांकडून दुय्यम स्थान दिले जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images